आयकराबाबत काही माहिती Economic times मध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यातील ठळक माहिती खालील प्रमाणे
-
एकूण करदाते ६.३ कोटी इतके आहेत. नवीन कर सवलतीमुळे त्यातील जवळ जवळ ३ कोटी करदाते येत्या आर्थिक वर्षापासून कर भरण्यापासून मुक्त होणार आहेत.
-
एकूण आयकर—कंपन्याकडून मिळणारा आयकर धरून — अंदाजे ११ लाख कोटी इतका जमा होतो.
-
कंपन्याकडून मिळणारा कर—११ लाख कोटी पैकी —अंदाजे ५.५ लाख कोटी रुपये आहे.
-
एकूण नोंद झालेल्या कंपन्या १० लाख आहेत. त्यापैकी ८०% कंपन्या एकतर तोट्यात आहेत किंवा फार कमी उत्पन्न असलेल्या आहेत.
-
याचाच दुसरा अर्थ असा आहे की ५ लाख कोटी व्यक्तिगत कर वसुली ही ३ लाख कोटी करदात्याकडून होते. म्हणजे केवळ एकूण लोकसंखेच्या तुलनेत केवळ २.५% लोक आयकर भारत आहेत.
-
एकूण करदात्यापैकी १.५ लाख लोकांचे उत्पन्न १ कोटी पेक्षा जास्त आहे आणि यातील बरेचसे करदाते नोकरी करणारे आहेत.