30.06.2023– व्यवसाय करताना घ्यावयाची काळजी

आपण बँकेकडून घेत असलेल्या सुविधा साठी मालसाठा व येणी तारण असतात.

दर महिन्यास आपल्याला मालसाठा पत्रक द्यावे लागते. ह्या साठी कालमर्यादा साधारणपणे, ज्या महिन्याचे हे पत्रक असते त्या पुढील महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान च्या असतात.

आपण काय करतो तर बऱ्याच वेळेस हे स्टेटमेंट बँकेकडून स्मरणपत्र आल्याशिवाय देत नाही व जेंव्हा स्मरणपत्र येते तेंव्हा घाईघाईत हे स्टेटमेंट तयार करून घेतो व बऱ्याच वेळेस चेक न करता सही करून बँकेस देऊन टाकतो.

त्यामुळे अडचणी निर्माण होतात त्या टाळता येण्यासारख्या आहेत. त्याबाबतची चर्चा सोबत जोडलेल्या परिशिष्ट मध्ये आहे.