30.06.2023–Reliance upon ITR shall be made while determining compensation under Motor Vehicles Act
पूर्वी आपल्याला फक्त भांडवल पुरवठा व माल विक्रीचे पैसे एव्हढेच दोन मोठे विषय होते. पण आता त्याचबरोबर करोनानंतरचे परिणाम –रशिया युक्रेन युद्ध — कच्या मालाचे चढे भाव –चढे व्याज दर –निर्यातीवर मर्यादा वगैरे अडचणी उभ्या राहिल्या. आपल्यापैकी कित्येकांना यापुढे काय करायचे ते देखील कळेनासे झाले आहे. पण सर्वात महत्वाचे – माझ्या दृष्टीने – आता यापुढे व्यवसाय करायच्या पध्दतीत काही बदल करायचा का –ताळेबंद समजून घेणे आवश्यक आहे का –कॅश फ्लो सिस्टीम शिकून घेऊन त्याप्रमाणे योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे का याचा विचार देखील आपण करणे गरजेचे ठरणार आहे. मला जे उपयुक्त वाटते ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही विचार करा , तुमचे मंत कळवा. पण एक गोष्ट नक्की करा—मागच्या पानावरून पुढे चालू – असे करू नका. काय करायला पाहिजे याची थोडी फार कल्पना या संकेतस्थळावरील माहितीवरून नक्कीच समजेल —शिवाय आपल्याला इतरही काही उपयुक्त [ व अगदी लेटेस्ट ] माहिती देण्याचाही प्रयत्न असणार आहे. याचाही तुम्हांला उपयोग होईल.