अस्वस्थ करणारी बातमी — अनिल तिकोटेकर

आज काल आपण रोजच वाईट बातम्या वाचतोय , ऐकतोय .  इतके दिवस वाचतोय / ऐकतोय की आपल्या संवेदना नष्ट होत चालल्याय असे वाटते. आजकाल एखादी व्यक्ती करोना मुळे मृत्यू पावली — ही बातमी फारशी महत्वाची वाटत नसून किती शंभर  —करोना मुळे — मृत्यू  पावले  हाच आकडा महत्वाचा वाटतो.   बर हा आकडा शंभरी कधीच पार पडून गेला आहे. पण आता हजारो / लाखो हा आकडा जोर पकडू लागला आहे व एखाद्या दिवशी हा आकडा कमी झाला तरी हायसे वाटते. असेही वाटते की  कुठेतरी जग, करोना विरुद्धची लढाई जिंकणार.

मात्र मला अस्वस्थ करणारी बातमी वेगळीच आहे.

एका सर्व्हनुसार —  ४० दिवसाच्या लॉकडाउन नंतर —  आतापर्यंत १.२२ कोटी इतक्या लोकांनी रोजगार गमावला आहे. संपूर्ण बातमीसाठी —ही  लिंक   क्लिक करावी . १.२२ कोटी हा आकडा भारताशी संबंधित आहे.  CMIE ह्या संस्थेने अभ्यास करून हा आकडा प्रसिद्ध केला आहे. तसेच या संस्थेचे असेही म्हणणे आहे की सध्याचा जॉबलेस  रेट हा २७.१% इतका मोठा आहे. या १.२२ कोटी रोजगार गमावलेल्या लोकामध्ये फेरीवाले, रस्त्याच्या कडेने असलेल्या छोट्या छोट्या दुकानातून काम करणारे , तसेच बांधकाम क्षेत्रातील कामगार व सायकल रिक्षा वगैरे आहेत. श्री महेश व्यास [ CMIE चे प्रमुख ] असे म्हणतात की एवढा आकडा म्हणजे  ही मानवी शोकांतिका आहे. असे त्यांना वाटण्याचे कारण बेरोजगार झालेले लोक असुरक्षित / कमजोर वर्गातील आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही तऱ्हेचे सुरक्षा कवच नाही जे इतरांना लाभू शकते.

१.२२ कोटी हा आकडा हा अनौपचारिक [ इनफॉरमल ]  आणि असंघटित क्षेत्रातील काम करण्यारा लोकांचा आहे. हळूहळू हे लोण संघटीत क्षेत्रातील कामगाराकडे वळण्याची भीती आहे.

आपल्याकडे  जे काही झाले आहे त्याची तीव्रता अमेरिकेत काय झाले आहे याच्याशी तुलना करून समजू शकते. अमेरिकेत ज्यांचा रोजगार बुडाला आहे अशांची संख्या ३० लाख एवढी आहे. महणजे आपल्याकडील आकडा त्यांच्या चौपट आहे. 

१.२२ कोटी ह्या संख्येकडे आपण दुसऱ्या दृष्टीकोनातून देखील पाहायला पाहिजे ते म्हणजे या १.२२ कोटी लोकातील काहीजण त्यांच्या त्यांच्या घरातील एकमेव ब्रेडविनर असतील. अशा व्यक्तींवर एक किंवा दोन जण निश्चितच अवलंबून असतील व असे जर असेल तर १.२२ कोटी हा आकडा कैक लाखांनी वाढू शकेल.

माझ्या मनात आलेला विचार

असे अर्धपोटी / उपाशी राहणाऱ्या लोकांचा काय दोष ?  हे सर्वजण प्रामाणिकपणे कष्ट करून आपले पोट भरत होते. हे सर्वजण समाजाला सुरक्षा कवच म्हणून जगत होते.  तुम्ही म्हणाल ज्यांचा रोजगार बुडाला आहे अशा व्यक्ती    आपले  सुरक्षा कवच कसे ?

माझे  म्हणणे असे आहे की असा  रोजगार मिळवून जे जीवन जगत होते त्यांना वाममार्गाने जगण्याची इच्छा होणारच नाही व त्यामुळे अशा प्रामाणिक पणे जगणाऱ्या व्यक्तींचे आपल्या भोवती सुरक्षा कवच नाही का निर्माण होत कारण अशा व्यक्ती पैकी काही जण—-पोटाची खळगी भरण्यासाठी —वाम मार्गाला लागल्या तर किती तरी प्रश्न निर्माण होतील व तेंव्हा पोलीस व इतर यंत्रणा फारशी उपयोगी पडू शकणार नाहीत. जरी कायद्याच्या दहशतीने काही इप्सित साध्य केले गेले तरी आपण असुरक्षित वातावरणात जगणार हे निश्चित.

हे सर्व होऊ द्यायचे नसेल तर आपण काय करू शकतो ? लवकरात लवकर अर्थव्यवस्थेने उभारी घ्यावी यासाठी जो काही प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर का होईना तो करायाला सुरुवात केली पाहिजे. तसेच हाही विचार रुजवायला पाहिजे की करोनाविरुद्धची लढाई तर जिंकायचीच आहे पण ती सोपी नाही याची जाणीव सतत ठेवणे आवश्यक आहे.   तसेच असाही ठाम विचार केला पाहिजे की करोनाला घाबरून चालणार नाही कारण हा शत्रू आपल्या बरोबरच काही महिने [ कदाचित काही वर्षे ] राहणार आहे.

122 million people lost their jobs in India during COVID-19 lockdown: CMIE | Deccan Herald

 

Leave a Reply