Care we need to take while doing business

काही अडचणीमुळे आपले बँकेतील कर्ज खाते / कॅश क्रेडीट खाते बँकेच्या नियमाप्रमाणे चालू शकत नाही. त्यामुळे बँक नाराज असू शकते. काही वेळेस अशी नाराजी बँकेच्या सेवकवर्गाच्या देहबोलीतून दिसते व त्यामुळे आपण अजूनच खजील होतो. साहजिकच आपण स्वतः हून बँकेच्या अधिकाऱ्यास भेटून आपली अडचण सांगून त्यांच्याकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करणे ही फार दूरची गोष्ट झाली.

काही वेळेस असे अधिकारी भेटतात की जे स्वतः हून अशा अडचणीत आलेल्या कर्जदाराला बोलण्यासाठी उद्युक्त करतात. असे अधिकारी आहेत म्हणून बरेच प्रश्न सुटत असतात यात शंका नाही.

पण आपणहून बँकेच्या अधिकाऱ्यास भेटून आपल्या अडचणी सांगावयास काय हरकत आहे. काही वेळेस बँकेच्या अधिकाऱ्याशी बोलताना आपण गांगरून जातो कारण त्या अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नांना आपल्याकडे समर्पक उत्तरे नसतात व अशा वेळेस आपली केस अजून अवघड बनते. होते काय की बँकेचे अधिकारी त्यांना पाहिजे असलेली उत्तरे आपल्याकडून मिळण्याची वाट पहात असतात तर आपण आपल्याला भेडसावत असलेल्या प्रश्नांची उत्तरे बँकेकडून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात बऱ्याच वेळेस असे होते की संबधित बँक कर्मचाऱ्यास आपल्याला पाहिजे तेव्हढा वेळ देता येत नाही कारण त्यांना इतर कामाचाही ताण असतो. अशा वेळेस आपण आपले म्हणणे मुद्देसूद रित्या लिहून दिले तर ? कदाचित त्याचा उपयोग होईल.

शेवटी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या प्रश्नांची उकल बँकेकडूनच होणार आहे.

आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व मदत बँकेकडून मिळते असा विश्वास बाळगून वाटचाल केली तर अवघड काम देखील सोपे होते. काही माहिती सोबत जोडलेल्या फाइल आहे. कृपया थोडासा वेळ काढून ही माहिती वाचावी अशी विनंती आहे.