Care we need to take while doing business

आपण जेंव्हा आपल्याला एखादी आर्डर मिळते तेंव्हा आपण आनंदून जातो. तेंव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त आर्डर ची रक्कम व होणारा नफा दिसत असतो. पण आपण खालील बाबीकडे लक्ष देत नाही.

  1. आर्डर किती दिवसात पूर्ण करायची आहे ?
  2. आर्डर साठी लागणारा कच्चा माल सहजपणे व क्रेडीट वर मिळतोय का ?
  3. आर्डर सोबत काही आगाऊ रक्कम मिळणार आहे का ?
  4. आर्डर चे पैसे किती दिवसात मिळणार आहेत ?
  5. आर्डर प्रमाणे माल दिल्यावर चेक –पोस्ट डेटेड का होईना –मिळणार आहे का ?
  6. जर काही वाद निर्माण झाला तर jurisdiction कोणते असणार आहे ?

जर काही प्रश्न निर्माण झाले तर आपण अडचणीत येतो विशेषतः जर आर्डर मोठी असेल तर. म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. मी काही उदाहरणे घेऊन या बाबी अजून स्पष्ट करून नंतर सांगणारच आहे. तूर्तास एक लेख जोडत आहे, तो आपण वाचवा ही विनंती.