भारतीय स्टेट बँकेने (एबीआय) थकीत कर्जात मोठा घोटाळा झाल्याची माहिती शेअर बाजाराला कळवली आहे. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘एसबीआय’ने गेल्या वर्षात एकूण थकीत कर्जांपैकी सुमारे १२ हजार कोटींची थकीत कर्जे ताळेबंदातून गायब झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनात आले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या तपासानुसार ‘एबीआय’कडे एकूण १ लाख ८४ हजार ६८२ कोटींची थकीत कर्जे होती. मात्र २०१८-१९ या वर्षात बँकेने १ लाख ७२ हजार ७५० कोटींची थकीत कर्जे असल्याचे घोषित केले. निव्वळ थकीत कर्जे ७७ हजार ८२७ कोटींची असताना लेखा परीक्षण अहवालात बँकेने ६५ हजार ८९५ कोटींची दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे यामुळे एकूण कर्जे आणि जाहीर केलेली थकीत कर्जे यात ११ हजार ९३२ कोटींची तफावत असल्याचे आढळून आले आहे. ही थकीत कर्जे कुठे लेख परीक्षणातून वगळून कुठे गायब करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात एसबीआयने ८६२ कोटींचा नफा नोंदवला होता. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात थकीत कर्जांसाठी केलेल्या तरतुदीवर परिणाम झाला असल्याचे बँकेने म्हटलं आहे.
स्टेट बँकेचे कर्ज .१० टक्क्यांनी स्वस्त
बँकांकडून ताळेबंदात किंवा लेखा परीक्षणात थकीत कर्जे कमी दाखण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटनांमध्ये दोषी आढळणाऱ्या बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा देखील उगारलेला आहे. आता ‘एबीआय’सारख्या देशातील सर्वात मोठ्या बँकेने थकीत कर्जात घोळ झाल्याचे शेअर बाजाराला कळवल्यानंतर रिझर्व्ह बँक काय भूमिका घेणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.