- नुकतीच महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली त्याची एकूण रक्कम १.३४ लाख कोटी होईल असा अंदाज आहे.
- केंद्र सरकार मदत करणार नाही.
- राज्य सरकारला यापुढे तारेवरची कसरत करावी लागेल.
- खरा उपाय काय आहे ?
- किमान आधारभूत भाव ठरवून दिले गेले आहेत –प्रत्यक्षात किमती त्यापेक्षाही कमी आहेत.
- नोटा बंदीमुळे ग्रामीण भागातील पारंपारिक आर्थिक साखळी तोडली गेली आहे.
- अल्पकालीन तोडगा —
[अ] एमएसपी दराने खरेदी
[ब] खाजगी व्यापारातील स्टॉक ठेवण्याची मर्यादा काढा
[क] सरकार जो माल आपल्याकडे ठेऊ शकत नाही तो माल व्यापाऱ्यांना विकावा –वेळप्रसंगी तोटा सहन करून
[द] व्याज भरण्यासाठी एक वर्षाची मुदत ध्यावी व गरज भासल्यास सरकारने बँकांना तात्पुरता निधी उपलब्ध करून ध्यावा.
दीर्घकालीन तोडगा
- स्टोरेजसाठी पायाभूत सुविधा
- वाहतूक आणि शेतमाल उत्पादनाची प्रक्रिया
- बाजारपेठ शेतकरी चे हित पाहणाऱ्या असाव्यात.
- निर्यात धोरण शेतकरीभिमुख असावे
- शेतकऱ्यांना संगठीत करून मोठा कंपन्या किंवा सहकारी संस्था बनवावे
- सरकारने सिंचनामध्ये पैसे गुंतवावेत .
- सविस्तर माहिती वाचण्यासाठी लिंक क्लिक करावी.