उपभोक्ता महागाई दर गेल्या पांच वर्षातील सर्वात कमी –त्यामुळे व्याज दर कमी होण्याची अशा आहे —सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी–१३-०६-२०१७

  1. किरकोळ महागाई दर २.१% एवढा आहे
  2. औद्योगिक वाढ ३.१% एवढी आहे
  3. रिझर्व बँकेची व्याज दराबाबतची मीटिंग ऑगस्ट महिन्यात आहे
  4. FICCI [ फिकी ] चे म्हणणे असे आहे  की कमी व्याजदरामुळे उपभोक्त्याकडून मागणी वाढेल. निर्यात कमी झालीच तर त्यामुळे मागणी कमी होईल व अशा तऱ्हेने कमी होणाऱ्या मागणीला पर्यायी बढावा मिळेल .
  5. जीडीपी ६.१% मार्च तिमाही मध्ये होता जो गेल्या दोन वर्षातील नीचांक आहे.
  6. जीसटी अमलात आल्यानंतर काही प्रमाणात दाखल घेण्याजोगा  व्यत्यय येणार आहे.
  7.  जीसटी मुळे मालसाठा कमी ठेवण्याची प्रवृत्ती आहे व त्यामुळे देखील पुढील तिमाही मध्ये उत्पादनावर परिणाम होणार आहे कारण आहे तो मालसाठा कमी करणे हे उद्धिष्ट राहणार आहे.
  8. तसेच कॅपिटल गुड्स उत्पादनातील घट १.३% एवढी आहे –त्याचा अर्थ असा आहे की खाजगी भांडवली गुंतवणूक कमी झाली आहे.
  9. ग्राहकोपयोगी वस्तू च्या उत्पादनात ८.३% इतकी वाढ झाली आहे. त्याचा अर्थ असा आहे की खेडेगावातून मागणी वाढत आहे
  10.  बांधकाम आणि पायाभूत सुविधा माल उत्पादनात ५.८% एवढी वाढ झाली आहे.
  11. भाज्याचे दर कमी झाले आहेत तसेच अन्नधान्य भावात वाढ न होता भाव उलट कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे जे आंदोलन झाले त्याचे एक कारण हे देखील आहे. [ inflation in vegetables and pulses crashed 13.44% and 19.45%, respectively. ]
  12. पुढील माहिती साठी खालील लिंक क्लीक करावी

via Inflation: May inflation at 5-year low, raises rate cut hopes – The Economic Times

Leave a Reply