शेती व शेतकरी — सविस्तर माहितीसाठी लोकमत मधील श्री विजय दर्डा यांचा लेख वाचावा –१२-०६-२०१७

  1. देशात सध्या शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. देशाच्या अन्नदात्याने रस्त्यावर उतरण्यासारखी परिस्थिती का बरं निर्माण झाली? याचे उत्तर सरळ आहे आणि ते हे की, या देशातील शासनव्यवस्थेने शेतकऱ्यांना नेहमीच अनाथ मुलांसारखी वागणूक दिली आहे.
  2. सरकारी आकडेवारी सांगते की, देशातील सुमारे साडे २६ कोटी लोकांचा चरितार्थ शेतीशी निगडित आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर एकूण १२ लाख ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. देशातील उद्योगपतींना बँकांनी दिलेल्या कर्जांपैकी सहा लाख ७० हजार कोटी रुपयांची कर्जे बुडित खात्यात गेल्यात जमा आहेत.
  3. कर्जमाफीचा संपूर्ण भार सोसण्याएवढी राज्यांची आर्थिक स्थिती मजबूत नाही, हेही खरे. तरीही हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो की, उद्योगांना बुडित कर्जांमध्ये सवलती मिळतात, वर करांमध्ये सवलती दिल्या जातात, मग हेच सर्व शेतकऱ्यांना का मिळू नये? 
  4. देशात कृषी विद्यापीठे व महाविद्यालये खूप निघाली, पण त्यांची अवस्था पांढऱ्या हत्तीहून काही वेगळी नाही. कागदोपत्री भरपूर संशोधन होते, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत ते कितपत पोहोचते? शेतीचे आधुनिक ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारा दुवा म्हणून हजारो कृषी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याची गरज आहे. यासाठी सरकारने प्रयत्नशील व्हायला हवे. पद्धतशीर योजना आखून त्या राबवाव्या लागतील. याला कित्येक वर्षे लागतील. पण त्याने शेतकऱ्यांची स्थिती नक्की सुधारेल.

 

via शेतकऱ्यांची अवस्था दयनीय अनाथ मुलांसारखी!

Leave a Reply