-
रिलायन्स कम्युनिकेशन्स ला कर्जातून बाहेर काढण्यासाठी कर्जाची पुनर्रचना [ restructuring ] करण्याचे ठरत आहे.
-
या योजनेमुळे रिलायन्स कम्युनिकेशन्स ला ४५००० कोटी रुपये कर्जासाठी ७ महिने वेळ मिळणार आहे. या ७ महिन्याच्या कालावधीत परत फेड करणे अपेक्षित नाही.
-
कंपनीचे अध्यक्ष श्री अनिल अंबानी यांनी घोषणा केली आहे की पुढील तीन महिन्यात २५००० कोटी एवढ्या रकमेने कर्ज कमी होईल. डिसेंबर २०१७ अंतिम तारीख आहे पण सप्टेंबर २०१७ अखेर हे होण्याची शक्यता आहे.
-
श्री अनिल अंबानी यांचे असेही म्हणणे आहे की कदाचित जागतिक व्यवसाय विकण्याचाही पर्याय असू शकेल
-
त्यांनी पुढे असेही सांगितले की त्यांनी AIRCEL बरोबर एक करार केला आहे शिवाय वायरलेस कंपनी [ AIRCOM ] –जी केवळ भारतातील व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल —-स्थापण्याचा विचार आहे . तसेच Reliance Infratel चा हिस्सा Brookfield [ कॅनडा ] या कंपनीला विकण्याचा विचार आहे.
-
वरील सर्व व्यवहारातून कमीत कमी २५००० कोटी रुपये येतील–असा त्यांचा अंदाज आह
via RCom gets 7-month reprieve from lenders to pay debt | Business Standard News