- एकीकडे शेतीची उत्पादनक्षमता वाढत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.
- हा विरोधाभास नाही काय ?
- जे काही आंदोलन चालले आहे —-मध्य प्रदेशातील आंदोलन तर हिंसक बनत चालले आहे —त्या आंदोलनामागील मुख्य कारण / घटक म्हणजे —आर्थिक संकट–मार्केट failures [ किमती संदर्भात ] –सदोष सरकारी धोरण वगैरे
- वर वर पाहता आपणास असे दिसेल की उत्तर प्रदेश सरकारने ३६००० कोटी रुपये इतकी कर्ज माफी दिली म्हणून इतर ठिकाणी तशी मागणी होत आहे. परंतु तसे नाही.
- बऱ्याच बाबतीत फसलेले धोरण देखील सध्याच्या अशांतीला कारणीभूत आहे.
- महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी अस्वस्थ आहे याचे मुख्य कारण —चांगले पीक हातात येऊन देखील त्याचा फायदा झाला नाही कारण किमती पडल्या व त्याचे नुकसान झाले. उदाहरणार्थ तूर डाळीचे भाव ६३% खाली आले [ डिसेंबर २०१५ ते डिसेंबर २०१६ या दरम्यान ]
- तसेच मार्केट मध्ये पुरवठा वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे सरकारने आयात थांबवली नाही–तसेच निर्यातीस बंधने घातली .
- त्यातच नोटा बंदीमुळे खेडेगावात रोख रकमेची टंचाई झाली.
- शेतकरी कर्ज फेडू शकला नाही व त्याला त्यामुळे नवीन कर्ज मिळू शकत नाही. या सर्वातून कर्ज माफीची मागणी पुढे आली.
- पण कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे. खरे प्रश्न वर उल्लेख केलेले –त्यावर कायम स्वरूपी उपाय शोधणे आवश्यक
via Farmers on the brink | Business Standard Editorials