- भारतातील शेती बहूतांश करून पावसावर अवलंबून आहे. तसेच बहुतांश ठिकाणी शेती चे उत्पन्न फारच कमी येते. ग्राउंड वाटर टेबल ची व्यवस्था करणे गरजेचे आहे म्हणजे जर मान्सून चांगला झाला नाही तरी निदान खरीफ पिक घेण्यासाठी तरी अडचण येऊ नये. सरकारने यात पुढाकार घेतल्यास गरीब शेतकऱ्यांना मदत होईल.
- महाराष्ट्र व मध्य प्रदेश मध्ये कोरड वाहू जमिनीवर डाळीचे उत्पादन घेतले जाते. कारण या पिकास जास्त पाणी लागत नाही व मान्सून च्या पाण्यावर भागते. तसेच या पिकामुळे जमिनीचा कस वाढतो . [nitrogen-fixing properties,] डाळीच्या किमती कधी खाली तर कधी वर होत असतात. त्यामुळे ज्या वर्षी भाव मिळत नाही त्यावर्षी नाराजी निर्माण होते व आंदोलनाला आमंत्रण मिळते.
- गरिबांना प्रोटीन योग्य त्या प्रमाणावर मिळू शकत नाही व डाळीमध्ये प्रोटीन असते. त्यामुळे डाळीचे जास्तीतजास्त उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यामुळे देखील सरकारला या विषयात रस असणे गरजेचे आहे . कारण डाळ सगळ्यात स्वस्त स्रोत [ source ] आहे.
- गरीब शेतकऱ्यांना –बेभरवशी मान्सून मुळे व डाळीच्या किमतीतील चढ उतारामुळे —नवीन बियाणे घेणे परवडत नाही. म्हणून सरकारने यात पुढाकार घेणे आवश्यक आहे.