- व्यक्तिगत माहिती कोणत्याही परिस्थितीत लिक होणार नाही. असे करणाऱ्याला तीन वर्षापर्यंत शिक्षा आहे.
- आधार नंबर हा गुप्त नंबर नाही. पण याचा अर्थ असा नाही की हा नंबर सहजपणे इतरांना उपलब्ध व्हावा.
- परंतु हा नंबर चुकून कुणाला माहित झाला तरी फारसे बिघडणार नाही कारण बँक खाते व्यवहारास OTP ची व्यवस्था असते.
- गेल्या पाच वर्षात ६५० कोटी व्यवहार आधार माध्यमातून झाले आहेत. पण एकाही व्यवहारात फसवणूक झाल्याचे आढळून आले नाही.
- आधार कायद्यामध्ये सुरक्षितता आणि डेटाची गुप्तता याबद्दल पूर्ण अध्याय [chapter ] आहे.
- फिंगरप्रिंट्स किंवा IRIS [ डोळ्याशी संबधित ] याच्याशी छेड छाड झाल्यास हा गुन्हा ठरू शकतो. सही बनावट करणे जसा गुन्हा आहे तसा हा देखील गुन्हा होऊ शकतो.
- बायोमेट्रिक्स लॉक करण्याची सोय आहे.
- आधार डेटा संपूर्णतः सुरक्षित आहे. गेल्या साडेसहा वर्षात एक देखील डेटा लिक झाला नाही.
via income tax returns: Objective of Aadhaar is to include, not exclude: Ajay Bhushan Pandey, CEO, UIDAI – The Economic Times