रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करावी की करू नये, या प्रश्नावरून केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात निर्माण झालेले मतभेद संघर्षाकडे वाटचाल करीत आहेत. चालू वर्षाच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतीही कपात न करता केंद्र सरकारच्या अपेक्षांना सुरुंग लावला आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी त्वरित प्रतिक्रिया देताना, रेपो दरात सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कपात करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. त्यातून केवळ देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत निर्माण झालेले मतभेदच नव्हे तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय अर्थखाते यांच्यातील सुप्त संघर्षच उघडकीस आला आहे.
via rbi govt clash over repo – editorial in Marathi, Maharashtra Times