Crude Oil Crisis; युद्धामुळे जगासमोर ‘काळं’ संकट; 50 दिवसांच्या नुकसानीचा आकडा ऐकून चक्रावून जाल, महत्त्वाच्या गोष्टीचा ‘लिमिटेड’ साठा | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/us-iran-conflict-led-global-oil-crisis-50-days-of-crisis-in-middle-east-results-50-billion-dollars-oil-loss/articleshow/130348919.cms

Crude Oil Crisis: पश्चिम आशियातील संघर्षामळे तेलाच्या उत्पादनात मोठी घट, निर्यातीत घट आणि वाढत्या किमतींमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर दबाव आला ज्याचा परिणाम भारतातही स्पष्टपणे दिसून येत आहे.

$50 billion worth of crude lost in 50 days(फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

Iran US War Impact: इराण-इस्रायलमधील तणावामुळे गेल्या 50 दिवसांपासून जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच यामुळे 50 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचे कच्चे तेल बाजारात पोहोचण्यास अडथळा आला असून 500 कोटी बॅरलहून अधिक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

तेल-गॅस पुरवठ्याचं संकट आणखी गहिरं होणार
50 दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्या संघर्ष सुरु असून पश्चिम अशियातील या तणावाचा सर्वाधिक फटका तेल आणि गॅस पुरवठ्यावर झाला असून उत्पादनातील व्यत्ययांमुळे अंदाजे 50 अब्ज डॉलर्स किमतीचे कच्चे तेल बाजारात पोहचू शकलेले नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार पुरवठ्यातील तुटवडा लवकर दूर होण्याची शक्यता नसल्यामुळे या संकटाचा परिणाम केवळ आताच नव्हे, तर येत्या अनेक महिन्यांपर्यंत आणि वर्षांपर्यंत जाणवेल असे तज्ज्ञांनी म्हटले.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी लेबनॉनमधील युद्धविरामनंतर होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करायची घोषणा केली, ज्यामुळे व्यापारी जहाजांच्या प्रवाशाचा मार्ग मोकळा झाला. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध संपवण्यासाठी लवकरच करार होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली पण, कधी होईल अद्याप अनिश्चित आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाल्यापासून जागतिक बाजारपेठेतून 50 कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल आणि कंडेन्सेट काढून टाकले गेले असून केप्लरच्या आकडेवारीनुसार, हे आतापर्यंतचे सर्वात मोठे ऊर्जा पुरवठा संकट मानले जात असून, यामुळे जागतिक पुरवठ्यावरील दबाव वाढला आहे.

तेल उत्पादनात इतके नुकसान
गेल्या महिन्यात (मार्च) आखाती देशांच्याकच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज जवळपास 8 कोटी बॅरलची घट झाली, जे जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्या – एक्सॉन मोबिल आणि शेवरॉन यांच्या एकत्रित उत्पादनाइतके आहे. त्याचवेळी, सौदी अरेबिया, कतार, UAE, कुवेत, बहरीन आणि ओमानमधून होणारी जेट इंधनाची निर्यात फेब्रुवारीतील 19.6 कोटी बॅरलवरून मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत मिळून 4.1 कोटी बॅरलपर्यंत घसरली.

कच्च्या तेलाचा साठा घटला
मध्य-पूर्वेत संघर्षाचा भडका उडाल्यापासून क्रूड तेलाची किंमत सरासरी 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचलेली. अशाप्रकारे, पुरवठ्यातील अडथळ्यामुळे अंदाजे 50 अब्ज डॉलर महसुलाचे नुकसान झाल्याचे यावरून दिसून येते. ही रक्कम जर्मनीच्या वार्षिक जीडीपीच्या अंदाजे 1% किंवा लॅटव्हिया आणि एस्टोनियासारख्या लहान देशांच्या अख्ख्या अर्थव्यवस्थेइतकी आहे.

Leave a Reply