Property Rights of Heir After Owner’s Death; कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर वाद विवाद न करता मिळवा संपत्तीचा हक्क; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/business/real-estate-news/how-to-avoid-property-dispute-essential-steps-heirs-should-take-after-owners-death/articleshow/129994593.cms

Property Division Rules: मालमत्तेचे हक्क, वाद, वाटप आणि तत्सम बाबींशी संबंधित अनेक प्रकरणे उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत — यांपैकी अनेक प्रकरणे टाळता आली असती, जर मूळ मालमत्ता मालकाच्या कायदेशीर वारसांनी मालकाच्या हयातीत किंवा त्यांच्या मृत्यूनंतर वेळीच आणि योग्य पावले उचलली असती.

how to avoid property dispute? essential steps heirs should take after owners deathकुटुंबातील वाद टाळून मिळवा संपत्तीचा हक्क(फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

Property Ownership: देशभरातील न्यायालयात मालमत्तेचे हक्क, वाद, वाटप आणि तत्सम बाबींशी संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत पण मूळ मालमत्ता मालकाच्या कायदेशीर वारसांनी मालकाच्या हयातीत किंवा त्यांच्या मृत्यूनंतर वेळीच आणि योग्य पावले उचलली पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणताही वाद टाळता येईल.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्ता किंवा संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी संरचित दृष्टिकोनाची गरज असते, ज्याची सुरुवात मृत्युपत्राची तपासणी किंवा कायदेशीर वारसांना ओळखण्यापासून होते. महसुली नोंदी अपडेट करणे आणि आणि मालमत्तेच्या स्वरूपाचे मूल्यांकन करणे देखील के महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व कौटुंबिक व्यवस्थांची नोंदणीकृत दस्तऐवजांद्वारे नोंद केल्याने भविष्यातील वाद टाळता येतात आणि मालकी हक्क स्पष्ट केला जाऊ शकतो.

मालमत्तेच्या मालकाने Will केले आहे का? तपासा

मालमत्तेच्या मूळ मालकाच्या वारासदाराने मृत व्यक्तीने मृत्युपत्र केले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. गेल्या वर्षी केलेल्या एका दुरुस्तीनुसार आता प्रोबेट ऐच्छिक करण्यात आले असले तरी, वैध मृत्युपत्र अस्तित्वात असल्यास त्याची कायदेशीर वैधता अधिक मजबूत करण्यासाठी प्रोबेट करून घेतले पाहिजे.

मालमत्तेचा मूळ मालक मृत्युपत्र न करता (निर्वसीयत) मरण पावला असेल, तर हिंदू वारसा हक्क कायदा, 1956 या लागू वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसदारांची ओळख पटवली पाहिजे आणि कायदेशीर वारस प्रमाणपत्र प्राप्त मिळवले पाहिजे.

7/12 उतारा, फेरफार आणि महसूल रेकॉर्ड अपडेट करा
कायदेशीर वारसाची ओळख पटवल्यानंतर मालमत्तेमध्ये हक्क प्राप्त झालेल्या कायदेशीर वारसांची नावे समाविष्ट करण्यासाठी, वैधानिक आणि महसूल रेकॉर्डस् (जसे की मालमत्ता पत्रक, 7/12 उतारा किंवा नगरपालिका अभिलेख) अपडेट करा.

मालमत्तेचे स्वरूप तपासा
त्यानंतर मालमत्तेचे स्वरूप देखील काळजीपूर्वक तपासा. म्हणजे मालमत्ता स्व-अर्जित आहे, वडिलोपार्जित आहे, फ्रीहोल्ड आहे, लीजहोल्ड आहे, की CIDCO किंवा MHADA सारख्या वैधानिक प्राधिकरणांच्या अधिपत्याखाली येते —यावर अवलंबून विविध कायदेशीर बाबी लागू होतात.

त्यानंतर कौटुंबिक मालमत्तेच्या व्यवस्थांची लेखी नोंद करा आणि केवळ तोंडी किंवा नोंदणीकृत नसलेल्या व्यवस्थांवर अवलंबून राहू नका. रिलीज डीड, पार्टिशन डीड किंवा गिफ्ट डीड यांसारख्या नोंदणीकृत दस्तऐवजांद्वारे योग्यरित्या नोंदवल्या पाहिजेत. तसेच तोंडी किंवा अनोंदणीकृत व्यवस्था टाळल्या पाहिजेत जेणेकरून अंमलबजावणी करणे कठीण होणार नाही.

कोणत्या कारणांमुळे मालमत्तेचे वाद उद्भवतात?

स्पष्ट वारसा हक्काच्या कागदपत्रांचा अभाव, भावंडांमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटणीवरून मतभेद, मृत्युपत्राचा अभाव किंवा ते अवैध असणे, जमिनीच्या सीमांवरून शेजाऱ्यांमधील वाद आणि चुकीची मालकी हक्काची कागदपत्रे यांमुळे अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेशी संबंधित वाद-विवाद समोर येतात. याशिवाय फसवणूक, बिल्डर-खरेदीदार यांच्यातील वाद आणि कराराच्या अटींचा भंग देखील प्रमुख कारणे आहेत.

Leave a Reply