*Let us educate each other and thus make them more confident while facing cyber threats– Material courtesy well-wisher on whatsapp

*आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणूक वेगाने वाढत आहे. दररोज हजारो लोक ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. पण आता घाबरण्याची गरज नाही. सरकारने आपल्या सुरक्षेसाठी विशेष हेल्पलाईन तयार केल्या आहेत*

🚨 *महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर – लक्षात ठेवा*

*📞 डायल 1930 – आर्थिक फसवणुकीसाठी*

◼️*कधी वापरावा:*

✅*बँक खात्यातून अचानक पैसे कापले गेले*

✅*फिशिंग लिंकवर क्लिक केल्यामुळे पैसे गेले*

✅*UPI/ऑनलाइन पेमेंट फसवणूक*

✅*क्रेडिट/डेबिट कार्ड फसवणूक*

✅*लॉटरी/इनाम फसवणूक*

◼️ *काय होते*

✨*तातडीने कॉल करा*

✨*फसवणुकीच्या 24 तासांत कॉल केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त*

✨*कॉल केल्याने संशयित खाते तात्काळ स्थगित केले जाते*

*पैशांची हालचाल थांबविण्यात मदत होते*

✨ *लक्षात ठेवा: 1930 वर फक्त खाते स्थगित केले जाते, FIR घेतली जात नाही*

➖
➖
➖
➖
➖

*📞 डायल 1945 – सायबर गुन्ह्यांसाठी*

◼️*कधी वापरावा:*

✅*रॅन्समवेअर हल्ला (संगणक लॉक झाला)*

✅*सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले*

✅*लैंगिक छळ/खंडणी/ब्लॅकमेल*

✅*ऑनलाइन धमक्या मिळाल्या*

✅*पर्सनल डेटा चोरी*

✅*फेक प्रोफाईल/ऑनलाइन बदनामी*

◼️*काय होते:*

✨*घरबसल्या e-FIRनोंदवता येते*

✨*कायदेशीर कारवाईसाठी तक्रार दाखल होते*

✨*तज्ञ मदत मिळते*

✨*24×7 सेवा उपलब्ध*

🟧 *सायबर फसवणुकीचे प्रकार – सावध राहा*

*1. बँकिंग फसवणूक*

*फेक बँक कॉल्स/SMS*

*OTP मागणे*

*KYC अपडेटची फसवी लिंक*

*लॉटरी/इनाम जिंकल्याचे खोटे संदेश*

*2. नोकरी/शिक्षण फसवणूक*

*घरबसल्या लाखो कमवा*

*फेक नोकरी ऑफर*

*प्रवेश फी/रजिस्ट्रेशन फी भरून फसवणूक*

*3. प्रेम/नातेसंबंध फसवणूक*

*ऑनलाइन मैत्री करून पैसे मागणे*

*फेक प्रोफाईल वापरणे*

*इमोशनल ब्लॅकमेल*

*4. खरेदी फसवणूक*

*स्वस्त उत्पादनांचे फेक जाहिराती*

*पैसे घेऊन माल न पाठवणे*

*नकली वेबसाईट*

*5. सोशल मीडिया फसवणूक*

*अकाउंट हॅक करणे*

*फेक न्यूज पसरवणे*

*व्यक्तिगत माहिती चोरणे*

*स्वतःचे संरक्षण कसे करावे?*

✅ *करावे:*

*1.मजबूत पासवर्ड वापरा (अक्षरे, अंक, चिन्हे मिक्स करा)*

*2. प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड ठेवा*

*3. Two-Factor Authentication (2FA) नक्की चालू करा*

*4. संशयास्पद लिंक/ईमेल उघडू नका*

*5. कुणालाही OTP/CVV/PIN शेअर करू नका*

*6. बँक स्टेटमेंट नियमित तपासा*

*7. फक्त सुरक्षित वेबसाईट (https://) वापरा*

❌ *करू नका:*

*1. अनोळखी व्यक्तींना बँक माहिती देऊ नका*

*2. सार्वजनिक WiFi वर बँकिंग करू नका*

*3. व्यक्तिगत माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका*

*4. “खूप स्वस्त” ऑफर पाहून लगेच पैसे भरू नका*

*5. दबावात येऊन तातडीने निर्णय घेऊ नका*

◼️ *फसवणूक झाली तर तातडीने काय करावे?*

*पहिली 5 मिनिटे:*

*1. 📞 1930 वर कॉल करा (आर्थिक फसवणूक)*

*2. 📞 1945 वर कॉल करा (सायबर गुन्हा)*

*3. बँकेला तात्काळ कॉल करा*

*4. सर्व स्क्रीनशॉट/व्हिडिओ जतन करा*

◼️*पुढील पावले:*

*1. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा*

*2.www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार करा*

*3. बँक खाते/कार्ड तात्काळ ब्लॉक करा*

*4. पासवर्ड बदला*

✅ *ऑनलाइन तक्रार कशी करावी?*

⭐*वेबसाईट:* *www.cybercrime.gov.in*

➖*पावले:*

*1. वेबसाईट उघडा*

*2. “Report Cybercrime” वर क्लिक करा*

*3. मोबाईल नंबर व ईमेल टाका*

*4. OTP टाका*

*5. फसवणुकीचा प्रकार निवडा*

*6. संपूर्ण तपशील भरा*

*7. पुरावे अपलोड करा (स्क्रीनशॉट, SMS)*

*8. सबमिट करा*

✨ *तुम्हाला कम्प्लेंट नंबर मिळेल – हा नंबर सुरक्षित ठेवा*

*लक्षात ठेवा – महत्त्वाचे सूत्र*

*”जर खूप चांगले वाटत असेल, तर कदाचित ते खोटे असेल*

🚨 *चेतावणीची चिन्हे:*

🫷🏻*तातडीचा दबाव (“आत्ताच करा नाहीतर…”)*

🫷🏻*खूप स्वस्त किंवा मोफत ऑफर*

🫷🏻*व्यक्तिगत माहिती मागणे*

🫷🏻*चुकीची भाषा/व्याकरण*

🫷🏻*अनोळखी नंबर/ईमेल*

*कायदेशीर धमक्या देणे*

*विशेष सावधगिरी -*

*👨🏽‍🦳वयस्कांसाठी*

◾*वडिलधारी नागरिकांना विशेष लक्ष्य केले जाते! त्यांना:*

◾*पेन्शनचे पैसे अडकवणे*

◾*आरोग्य संबंधित फसवणूक*

◾ *रिश्तेदारांच्या नावाने पैसे मागणे*

👨🏽‍🦳*सूचना: आपल्या वडिलधाऱ्यांना डिजिटल सुरक्षेबद्दल शिकवा*

*जनता जागृत झाली पाहिजे*

🛑 *आपली जबाबदारी:*

*1. शिकवा – कुटुंब व मित्रांना सायबर सुरक्षेबद्दल माहिती द्या*

*2. सावध राहा – संशयास्पद क्रियाकलाप लगेच रिपोर्ट करा*

*3.शेअर करा – ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा*

*4.तक्रार करा – कोणतीही फसवणूक झाली तर गप्प बसू नका*

🛑✨ *लक्षात ठेवा:*

✅*तुमची चूक नाही – फसवणूक करणारा गुन्हेगार आहे*

✅*लाज वाटू देऊ नका – लगेच तक्रार करा*

✅*24 तास आवश्यक – जितक्या लवकर तक्रार तितके पैसे परत मिळण्याची शक्यता*

✅ *एक जागृत नागरिक = एक सुरक्षित भारत*

*आपत्कालीन नंबर:*

🚨 *आर्थिक फसवणूक: 1930*

🚨 *सायबर गुन्हा: 1945*

🚨 *पोलीस:112*

🚨 *महिला हेल्पलाईन: 1091*

*”सावध राहा, सुरक्षित राहा”*

Leave a Reply