गोल्ड लोन; या गोष्टी माहित आहेत का? –महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : मागील महिनाभरात कमॉडीटी बाजारात सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठला. सोन्यातील तेजीने ग्राहक आणि सराफांचे डोळे पांढरे झाले आहेत. विक्रमी स्तरावर सोने गेल्याने कर्ज घेणाऱ्यांसाठीही जादा रक्कम मिळणार आहे. ‘गोल्ड लोन‘ कसे मिळते, त्यासाठी किती व्याजदर असतो याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते.

भारतीय संस्कृतीत समृद्धीचं प्रतीक असलेल्या सोन्याला प्रचंड महत्व आहे. अनेकांच्या घरी पिढ्यानपिढ्या सोनं अमूल्य ठेवा म्हणून जतन केलं जाते. अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात. त्यामुळे भारतात सोन्याचा प्रचंड साठा आहे. मात्र हेच सोनं आर्थिक संकटाच्या वेळी उपयोगी पडते. सोनं गहाण ठेवून त्यावर कर्ज घेऊन आर्थिक संकट दूर करता येते. मात्र गोल्ड लोन घेणं अवघड आणि तितकंच खर्चिक देखील आहे. यात अनेक अटी असतात ज्याबाबत वेळीच स्पष्टता केली नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

पेट्रोल-डिझेल; आठ महिन्यांतील कमी दर

‘गोल्ड लोन’वर किती व्याज?

– बँका, एनबीएफसी, खासगी वित्त संस्था यांचा ‘गोल्ड लोन’साठी वेगवेगळा व्याजदर आहे. हा व्याजदर ९ टक्के ते २४ टक्क्यांच्या दरम्यान असतो. ‘गोल्ड लोन’मध्ये व्याजदर हा लोन टू व्हॅल्यू (LTV) यावर सुद्धा अवलंबून असतो. रिझर्व्ह बँकेची कमाल ७५ टक्के लोन टू व्हॅल्यूसाठी परवानगी आहे. त्यामुळे जर कमी रक्कम कर्ज म्हणून काढली तर त्यावर व्याज देखील कमी असते. ग्राहकाने ‘गोल्ड लोन’ काढण्याआधी बाजारात व्याजदरांबाबत खात्री करणे आवश्यक आहे.

प्रक्रिया शुल्क
– ‘गोल्ड लोन’वर प्रक्रिया शुल्क ०.२० टक्के ते २ टक्क्याच्या दरम्यान आहे. काही बँका सवलत म्हणून प्रक्रिया शुल्क रद्द करतात. काही संस्थांकडून त्यावर इतर सवलती दिल्या जातात. त्यामुळे प्रक्रिया शुल्कावर सवलतीची ग्राहकाने खातरजमा केली पाहिजे.

परतफेडीचा नियम
– गोल्ड लोन परतफेड करण्याबाबत अनेक पर्याय ग्राहकाला देण्यात आले आहेत. सुवर्ण कर्जाची रक्कम ग्राहक समान मासिक हप्त्यात फेडू शकतो. त्याशिवाय केवळ व्याज देण्याचा पर्याय, आगाऊ व्याज देण्याचा पर्याय असे पर्याय देखील ग्राहकासमोर असतात. यात मुद्दल मुदतपूर्ती वेळी भरावी लागते.

मुदतपूर्ती पूर्वी कर्जफेड
– ग्राहकाने कर्जाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी किंवा कर्ज घेतल्यानंतर सहा महिन्यांनी कर्जफेड केली तर सर्वसाधारणपणे बँका त्यावर त्यावर शुल्क आकारत नाहीत. मात्र मुदत पूर्ण होण्याच्या सहा महिने आधी कर्ज फेड केली तर त्यावर २ टक्के शुल्क आकारले जाते.

via interest on gold loan : गोल्ड लोन; या गोष्टी माहित आहेत का? – what are the interest rate in gold loan | Maharashtra Times

Leave a Reply