गेल्या आठवडय़ात जम्मू-काश्मिरात झालेल्या सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बठकीत विविध वस्तू आणि सेवांवरील कराच्या चौकटी निश्चित केल्या गेल्या. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून या कराच्या अंमलबजावणीस हिरवा झेंडा दाखवला. देशातील जवळपास सर्वच राज्यांनी अशी अधिवेशने बोलावून या घटनादुरुस्तीस मान्यता दिली आहे. याचा अर्थ या कराचा अंमल लवकरच आपल्याकडे सुरू होणार हे निश्चित. तेव्हा या वेळी या कराच्या गुणदोषांची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ही वेळ आहे ती या कराच्या रूपाने आपणासमोर काय वाढून ठेवले आहे, हे तपशीलवार समजून घेण्याची.
via loksatta agralekh on GST opinion part 1 | करसंहार – १ | Loksatta