सविस्तर माहितीसाठी Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
-
ज्यांनी ज्यांनी विक्रीकर , अबकारी कर व सेवा कर मध्ये नोंदणी केली त्यांनी जीसटी अंतर्गत नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे.
-
आतापर्यंत कर्नाटका राज्याने आघाडी घेतली आहे –तिथे ९२% व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश , तमिळनाडू व गुजरात या राज्यांनी आघाडी घेतली आहे.
-
परंतु इतर राज्यात एवढी प्रगती झाली नाही . सर्व देशात मिळून सरासरी ३७% एवढी आहे
-
सर्व व्यापाऱ्यांनी नोंदणी नाही करून घेतली तर १ जुलै ही तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
-
अर्थात घटने नुसार डेड लाईन १६ सप्टेंबर ही तारीख आहे.
-
विक्रीकर साठी नोंदणी आतापर्यंत ९२ लाखापैकी ६० लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. सेवा कराखाली नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांसाठी हा आकडा ३७% इतका आहे तर अबकारी साठी हा आकडा १९% एवढाच आहे.
-
भरीस भर म्हणून १ मे पासून online registration पोर्टल [ GSTN ]काही कारणामुळे बंद झाले आहे
-
काही जणांची अशी तक्रार आहे के त्यांचा डेटा upload होऊ शकला नाही त्यामुळे त्यांना ARN [ Application फॉर Registration Number ] मिळू शकला नाही.
-
एवढेच नव्हे तर e-signature सुद्धा यशस्वी होऊ शकली नाही
-
परंतु १ जुलै ही तारीख सहजासहजी पुढे जाऊ दिली जाणार नाही असेही उच्चपदस्त व्यक्तींचे म्हणणे आहे.