- सध्या CIBIL आपण घेत असलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर फेडतो की नाही , क्रेडीट कार्ड चे पेमेंट वेळेवर होते की नाही याचे रेकॉर्ड CIBIL या संस्थेकडे असते. त्यामुळे जर हे रेकॉर्ड चांगले नसेल तर कर्ज मिळणे दुरापास्त होते
- जर तुम्ही मिळालेली क्रेडीट लिमिट [ कॅश क्रेडीट किंवा क्रेडीट कार्ड ] जर नेहमीच पूर्णतः वापरत असाल तर हा निगेटिव ठरतो.
- तसेच तुम्ही घेतल्या असलेल्या कर्ज किती सुरक्षित आहे हेही पहिले जाते. जर असुरक्षित [ Unsecured ] कर्जाचे प्रमाण जास्त असेल तर हाही निगेटिव ठरण्याची शक्यता असते.
- एकपेक्षा जास्त बँकाकडून / इतर आर्थिक संस्थाकडून कर्ज घेतले असेल तर जास्त काळजी घेतली जाते.
- तुम्ही ज्यादा तारण काय देणार आहात त्याला देखील महत्व आहे.
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे