मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा आई-वडिलांना अधिकार, पण एका प्रकरणात नाकारता नाही येत हक्क, कोर्टही मुलांच्या बाजूने देईल निकाल

Property Rights : कधीकधी अनपेक्षित परिस्थितींमुळे पालक आपल्याच पोटाच्या मुले-मुलींना मालमत्तेतून बेदखल करतात. त्यानंतर या मुलांचे पालकांच्या मालमत्तेवर कोणतेही हक्क राहत नाही, पण एक विशिष्ट हक्क पालकांनी आपल्या मुलांना देणे अनिवार्य आहे. त्यामुळे, तुम्ही तुमच्या मुलांना एका मालमत्तेतून बेदखल केले तरी वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्यासाठी न्यायालयात दाद मागू शकतात.

प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले तरीही न्यायालयाचा निर्णय जवळजवळ 100% मुलाच्या बाजूने लागण्याची शक्यता असते. लक्षात घ्या की न्यायालय कधीकधी अशा प्रकरणांमध्ये पालकांना पाठिंबा देतात पण, प्रकरणाच्या विशिष्ट बाबींवर आणि न्यायाधीशांच्या विवेकाधिकारावर अवलंबून असते, जे अपवाद आहेत. याशिवाय, न्यायालय स्वतः या प्रकरणात पालकांना कोणतीही मदत करू शकत नाही.

वडिलोपार्जित संपत्ती कोणकोणती असते?

आजोबा किंवा पणजोबांकडून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता वडिलोपार्जित मानली जाते आणि ही मालमत्ता किमान चार पिढ्या जुनी असली पाहिजे. तसेच्या काळात कुटुंबात कोणतंही विभाजन झालेलं नसावं विभागणी झाल्यास मालमत्ता वडिलोपार्जित राहत नाही. वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलगा आणि मुली दोघांचाही समान हक्क असतो.

इतकंच नाही तर वडिलोपार्जित मालमत्ताही वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता देखील मानली जाऊ शकते, पण सर्वच वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता वडिलोपार्जित नसते. हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 च्या कलम 4, 8 आणि 19 मध्ये वडिलोपार्जित मालमत्तेबाबत नमूद असून मालमत्तेची विभागणी झाल्यास वडिलोपार्जित मालमत्तेऐवजी अर्जित मालमत्ता बनते आणि पालक आपल्या मुलांना बेदखल करू शकतात.

वडिलोपार्जित मालमत्तेवरील मुला-मुलींचे अधिकार

दुसरीकडे लक्षात घ्या की प्रत्येक पिढीतील व्यक्तींची संख्या वाढत जाते त्यामुळे, वडिलोपार्जित मालमत्तेतील प्रत्येक सदस्याचा वाटा बदलू शकतो. त्याऐवजी, तुमच्या वडिलांना वारसा हक्काने मिळालेल्या वाट्यानुसार मालमत्तेची विभागणी केली जाते आणि तुमचा हिस्सा त्यानुसार निश्चित होईल. तुम्ही तुमच्या पालकांचे एकुलते एक अपत्य असल्यास तुमच्या वडिलांचा वारसा पूर्णपणे तुम्हाला मिळू शकतो.

तसेच तुम्हाला भावंडे असल्यास मालमत्ता तुमच्यासह त्यांच्यामध्येही विभागली जाईल. तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांना जास्त वडिलोपार्जित मालमत्ता वारसा हक्काने मिळू शकतो, तर इतरांना कमी मिळू शकतो. म्हणजे तुमच्या वडिलांना आणि त्यांच्याआधी त्यांच्या आजोबांना तुमच्या पणजोबांना किती मालमत्ता वारसा हक्काने मिळाली यावर तुमचा वाटा अवलंबून असेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला. पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव 2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या. 2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले. शैक्षणिक पात्रता​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा

Leave a Reply