प्रॉपर्टीच्या वादांतील सर्वात मोठा गैरसमज, मालमत्ता खरेदीनंतर फक्त Registration पुरेसं नाही; सरकार दरबारी ठरते कायदेशीर मालकी

Property Rules : मालमत्ता खरेदी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील मोठा निर्णय असतो, पण तरीही छोट्या-मोठ्या कारणांवरून जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत अनेकदा वाद निर्माण होतात. केवळ कागदांवर सही करून जमिनीची नोंदणी करणे पुरेसे नाही. मालमत्ता खरेदी करणाऱ्याने प्रत्येक दस्तऐवजात काय नमूद आहे आणि जमिनीची माहिती सरकारी नोंदी अचूक नोंदवली आहे की नाही, याचीही कात्री केली पाहिजे.

प्रॉपर्टीच्या दस्तऐवजांमधील छोट्या-मोठ्या त्रुटींमुळे मालकी हक्कावरून वाद, कर्ज मिळवण्यातील अडचणी किंवा कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशा बाबींचे निराकरण करण्यासाठी अनेकदा मोठा आर्थिक आणि वेळखाऊ खर्चाला सामोरे जावे लागू शकते.

जमिनीची खरेदी पूर्ण झाली असे मानण्यापूर्वी सगळी कागदपत्रे आणि सरकारी नोंदींची खात्री करून घ्या. नोंदणीनंतर, आवश्यक प्रक्रिया, जसे की लागू असल्यास mutation करणे आणि जमिनीच्या नोंदी अपडेट करण्याची खात्री करून घ्या. तसेच गरज भासल्यास मालमत्ता वकिलाची मदत घ्या.

Maharashtra TimesLTCG Tax Cut : शेअर बाजाराची सुस्ती दूर होणार? मार्केटमध्ये पुढच्या आठवड्यात मोठ्या हालचालींची शक्यता, एलटीसीजी कमी होणार की पूर्णपणे हटणार?

नोंदणीनंतर मालमत्तेचे म्युटेशन गरजेचे का?

भारतातील 70 टक्के जमिनीचे वाद mutation नावाचा महत्त्वाचा दस्तऐवज न मिळवल्यामुळे निर्माण होतात. केवळ उपनिबंधक कार्यालयात विक्रीपत्राची नोंदणी केल्याने जमीन त्यांची होते, असे अनेक लोकांना वाटते पण हा एक मोठा गैरसमज आहे.

मालमत्तेची नोंदणी केवळ विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील व्यवहाराचा, म्हणजेच कराराचा, पुरावा असतो. पण जोपर्यंत तुमचे नाव सरकारच्या जमीन महसूल नोंदींमध्ये रजिस्टर होत नाही, तोपर्यंत तुम्ही जमिनीचे एकमेव मालक बनत नाही.
Maharashtra TimesDA Hike Calculator: केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA वाढ कधी, 18000 ते 1 लाख सॅलरीवाल्यांचा पगार किती वाढणार? 63% डीएचे असे असेल कॅल्क्युलेशननोंदणी आणि दाखल-खारीज यामध्ये फरक काय?

मालमत्ता खरेदी करताना लक्षात घ्या की नोंदणी आणि दाखल-खारीज किंवा फेरफार या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. नोंदणी म्हणजे मालमत्तेचे हस्तांतरण आणि त्यासंबंधित शुल्क महसूल विभागाकडे हस्तांतरित करणे, तर दाखल-खारीजमध्ये नव्या मालकाचे नाव महसूल नोंदींत नोंदवले जाते.

केवळ दाखल-खारीजच्या नोंदीमुळे एखाद्या व्यक्तीला मालकी हक्क प्राप्त होत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे खरेदीदाराने विक्रीपत्र, जमिनीची पूर्वीची कागदपत्रे आणि मालकीची संपूर्ण चेन तपासावी.

म्युटेशन न करण्याचे धोके

मालमत्ता खरेदी करताना तुम्ही म्युटेशन केले नाही तर विक्रेत्याकडून तुमची फसवणूक होऊ शकते आणि मालमत्तेचा मालक तीच जमीन दुसऱ्या खरेदीदाराला विकू शकतो किंवा महसूल नोंदींमध्ये स्वतःचे नाव दाखवून बँकेकडून कर्ज घेऊ शकतात.

खरेदीदाराच्या या छोट्याशा निष्काळजीपणामुळे वर्षांनुवर्षे चालणाऱ्या लांबलचक दिवाणी खटला आणि न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागू शकते. यामुळे तुमचा पैसा आणि वेळ वाया जाऊ शकतो, तसेच मानसिक त्रासही होऊ शकतो.

मालमत्ता खरेदीपूर्वी कोणती कागदपत्रे तपासायची?

विक्रीपत्र आणि इतिहास : विक्रेत्याने जमीन कशी मिळवली आणि मालकी पूर्वीच्या मालकांशी कशी जोडलेली आहे, याचा तपास करा.

खतौनी, जमाबंदी किंवा इतर जमिनीच्या नोंदी : तुम्ही ज्या राज्यात जमीन खरेदी करत आहात, त्या राज्याच्या अधिकृत पोर्टलवर जमिनीच्या नोंदी तपासा.
देयके आणि कर : जमिनीशी संबंधित लागू महसूल, टॅक्स आणि इतर देयकांची माहिती मिळवा.

नकाशा आणि जमिनीची सीमा : सरकारी नोंदींमध्ये नोंदवलेल्या क्षेत्राची जमिनीच्या प्रत्यक्ष क्षेत्राशी तुलना करा.

न्यायालयीन खटले आणि विवाद : जमिनीवर कोणताही खटला, स्थगिती आदेश किंवा इतर कोणाचा दावा आहे का? याचीही खात्री करा.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला. पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव 2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या. 2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले. शैक्षणिक पात्रता​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा

Leave a Reply