साध्या कागदावर वारसदार घोषित करून गेले वडील! पण कोर्टात टिकेल का? एक चूक करू शकते कंगाल
Handwritten Will Valid or Not; साध्या कागदावर वारसदार घोषित करून गेले वडील! पण कोर्टात टिकेल का? एक चूक करू शकते कंगाल | Maharashtra Times
बऱ्याच वेळी लोकांना वाटतं की मृत्युपत्रासाठी स्टँप पेपर आणि कोर्ट केस आवश्यक आहे, पण साध्या कागदावर हाताने लिहिलेले मृत्युपत्र देखील वैध मानले जाते. होय, एखाद्याने आपल्या हाताने लिहिलेले इच्छापत्रही कायद्याने वैध आहे, पण यासाठी दोन महत्त्वाच्या अटी आहेत ज्या पूर्ण केल्या पाहिजे अन्यथ्या एक इंचही जमीन कोणाला मिळणार नाही.
भारतातील कुटुंबांमध्ये मालमत्तेशी संबंधित बाबींवर अनेकदा चर्चा होते आणि बहुतेक प्रकरणात पालक आपल्या इच्छेने संपत्ती मुलांमध्ये वाटू देऊ इच्छितात जेणेकरून त्यांच्या पश्चात संपत्तीवरून वाद होऊ नये. कधीकधी पालक किंवा कुटुंबातील इतर सदस्य अंतिम इच्छा किंवा मृत्युपत्र साध्या कागदावर लिहितात आणि निधनानंतर कुटुंबातील सदस्यांनान्यायालय किंवा कायदा अशा हस्तलिखित पत्राला मृत्युपत्र म्हणून मान्यता देईल का? असा प्रश्न पडतो.
मालमत्तेच्या बाबतीत सामान्य धारणा अशी असते की मृत्युपत्रासाठी स्टॅम्प पेपर आणि न्यायालयाचे चक्कर मारावे लागतात, पण भारतीय उत्तराधिकार कायद्यात या बाबतीत काही नियम केले आहेत जे प्रत्येक नागरिकाला माहित असले पाहिजे.
साध्या कागदावर लिहिलेले मृत्युपत्र वैध आहे की नाही?
भारतीय उत्तराधिकार कायद्यातील तरतुदींनुसार मृत्युपत्र नोंदणी करणे किंवा महागड्या स्टॅम्प पेपरवर इच्छापत्र करणेही आवश्यक नाही. कायद्यात मृत्युपत्र तयार करण्यासाठी विशिष्ट किंवा निश्चित स्वरूपाची तरतूदी नाही. म्हणजे तुमच्या पालक किंवा आजी-आजोबांनी साध्या कागदावर हाताने मृत्युपत्र लिहिले असेल तरीही कांद्याने वैध मानले जाईल पण, यासाठी काही इतर आवश्यक अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.
एका अटीशिवाय मृत्युपत्राला काहीच किंमत नाही
मृत्युपत्र साध्या कागदारही असले तरीही तो कागदही वैध मनाला जाईल. भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925 च्या कलम 63 मध्ये याबाबत एक नियम आहे, ज्यानुसार मृत्युपत्र कायदेशीररित्या वैध होण्यासाठी मृत्युपत्र करणाऱ्याची (मृत्यूपत्र देणारी व्यक्ती) स्वाक्षरी ही पहिली आवश्यकता असून किमान दोन साक्षीदारांची उपस्थिती आणि स्वाक्षरी आणखी एक सर्वात महत्त्वाची अट आहे.
साक्षीदारांच्या अनुपस्थितीत मालमत्तेचे काय होईल?
भारतीय वारसा कायदा साक्षीदारांची उपस्थिती महत्त्वाची आहे. मृत्युपत्र करणाऱ्याने इच्छा एका कच्च्या प्रतीवर लिहून दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यांसह स्वाक्षरी केली तर दस्तऐवज कायदेशीररित्या वैध मृत्युपत्र बनतो. साक्षीदारांशिवाय, असे मृत्युपत्र वैध मानले जाऊ शकत नाही किंवा अंमलात आणले जाऊ शकत नाही.
त्याचवेळी साक्षीदारांनी कोणत्या कारणास्तव कागदपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या नसतील तर परिस्थिती पूर्णपणे बदलते. अशा स्थितीत, कायदा असे गृहीत धरतो की व्यक्ती मृत्युपत्राशिवाय मृत्युमुखी पडली. मालमत्तेचे विभाजन मृत्युपत्राच्या अटी आणि शर्तींवर आधारित नाही तर वारसा कायद्याच्या नियमांनुसार केले जाईल. त्यामुळे सर्व कायदेशीर वारसांना वर्गानुसार मालमत्तेवर संबंधित हक्क मिळतील.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
मी वकिलाशिवाय मृत्युपत्र लिहू शकतो का?
होय, आता वकिलाचा सल्ला घेतल्याशिवाय तुमचे मृत्युपत्र बनवू शकता. तुम्ही भारतात वकिलाशिवाय कायदेशीररित्या वैध मृत्युपत्र साध्या कागदावर लिहून, मालमत्ता आणि लाभार्थींची स्पष्टपणे यादी करून, त्यावर स्वाक्षरी करून आणि दोन गैर-लाभार्थी साक्षीदारांनी ते प्रमाणित करून बनवू शकता, पण भविष्यातील वाद टाळण्यासाठी, विशेषतः जटिल इस्टेटसह, कायदेशीर पुनरावलोकनाची शिफारस केली जाते. नोंदणी पर्यायी आहे पण यामुळे तुमच्या मृत्युपत्राला प्रामाणिकपणा मिळतो आणि मुख्य म्हणजे मृत्युपत्र करणारा सुदृढ मनाचा आणि जबरदस्तीपासून मुक्त असावा.
मृत्युपत्र नसल्यास मालमत्तेचा वारसा कोणाला मिळेल?
पती-पत्नी, मुले, पालक आणि भावंड सामान्यतः क्लास-1 लाभार्थी मानले जातात आणि त्यांचे शेअर्स लिंग, वैवाहिक स्थिती आणि इतर कायदेशीर वारसांच्या उपस्थितीसारख्या घटकांवर आधारित बदलू शकतात.