Middle East War: आधी सूट, आता लूट! अमेरिकेची अट महागात; तेल संकटात रशियाची भरभराट; पुतीन यांची खेळी, भारताचा बळी

मॉस्को: मध्य पूर्व आशियात युद्ध सुरु झाल्यानं होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी खनिज तेल ाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणनं होर्मुझ मार्ग बंद केल्यानं अनेक देशांची कोंडी झाली आहे. खनिज तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. ही परिस्थिती पाहता अमेरिकेनं भारत ाला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली आहे. त्यासाठी ३० दिवसांची मुदत आहे. एका बाजूला भारत संकटात सापडलेला असताना रशियानं चढ्या दरानं तेल विक्री सुरु केली आहे. त्यामुळे भारताला खनिज तेल महाग मिळू लागलं आहे.

आखाती देशांमधून होणारी खजिन तेलाची वाहतूक बाधित झाल्यानं भारतानं रशिया कडून खरेदी सुरु केली. मात्र यावेळी रशियानं जुन्या दोस्तीची किंमत ठेवलेली नाही. याआधी रशिया भारताला तेल खरेदी करताना मोठी सवलत द्यायचा. पण आता संकट काळात रशियानं भारताला सूट दिलेली नाही. रशिया तेल व्यवहारातून चांगलीच वसुली करत आहे. रशियन तेलाला मागणी असल्यानं दर वाढले आहेत.

Leave a Reply