*Power of Attorney Rules for Property; मालमत्ता गमावून बसाल, संपत्ती दुसऱ्याच्या नावे करायचा Power of Attorney बद्दल कायदा समजून घ्या… | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/business/real-estate-news/power-of-attorney-rules-for-property-ownership-transfer-legal-rights-in-india-to-know/articleshow/124625384.cms

Power of Attorney for Property : पॉवर ऑफ ॲटर्नीमुळे एखाद्या मालमत्तेची मालकी मिळते का? त्यामुळे मालमत्तेच्या मूळ मालकाचे हक्क रद्द होतात का? हा प्रश्न अनेकदा उद्भवतो, विशेषतः जेव्हा पॉवर ऑफ ॲटर्नी एखाद्या नातेवाईक किंवा मित्राच्या नावाने दिली जाते. पण सत्य काहीसे वेगळे आहे.

Power of Attorney मुळे खरंच मालमत्तेची मालकी मिळते का?

Property Transfer Rules: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने गुरुग्राममधील आलिशान बंगल्याची जबाबदारी मोठा भाऊ विकास कोहली याच्याकडे सोपवली आहे. आपली प्रॉपर्टी भावाला देण्यासाठी विराटने GPA किंवा जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी नावाचा एक कायदेशीर दस्तऐवज तयार केला. विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्यांच्या मुलांसह लंडनमध्ये राहतो, त्यामुळे त्याच्या मालमत्तेच्या बाबींवर देखरेख करण्यासाठी वारंवार भारतात येऊ शकत नाही. म्हणूनच, पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे त्याने भावाला मालमत्तेशी संबंधित सर्व बाबी सहजतेने हाताळण्याचा अधिकार दिला.

पॉवर ऑफ ॲटर्नी हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीला तुमच्या वतीने काही कार्ये – जसे की मालमत्ता विकणे, तिची नोंदणी करणे, भाडे वसूल करणे किंवा बँक बाबी हाताळणे – करण्यास अधिकृत करतो. पण यामुळे कोणत्याही व्यक्तीला मालमत्तेचे मालकी हक्क मिळत नाही.

मालकी हक्क नव्हे फक्त अधिकार
प्रॉपर्टीच्या मूळ मालकाने तुमच्या नावे पॉवर ऑफ ॲटर्नी केली आहे म्हणजे, यामुळे तुम्ही फक्त मालकाच्या वतीने कायदेशीर कामे करू शकतात आणि तुम्ही स्वतः मालमत्तेचे मालक बनत नाहीत. मालकी केवळ नोंदणीकृत विक्री करार किंवा भेटवस्तू कराराद्वारे हस्तांतरित केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने 2011 मध्ये असेही म्हटले होते की पॉवर ऑफ ॲटर्नी एखाद्या व्यक्तीला मालमत्तेचा मालक बनवू शकत नाही. न्यायालयाने म्हटले होते की ते फक्त एक ‘अधिकृत दस्तऐवज’ आहे जो मर्यादित अधिकार देते पण मालकी हक्क देत नाही.

तुम्ही दुसऱ्या शहरात राहत असाल आणि तुमच्या मालमत्तेशी संबंधित कामे स्वतः करू शकत नसाल तर पॉवर ऑफ ॲटर्नी उपयुक्त दस्तऐवज आहे. उदाहरणार्थ, तुम्ही मुंबईत राहता आणि दिल्ली तुमची मालमत्ता असेल, तर तुम्ही तिथे तुमच्या विश्वासू व्यक्तीला पॉवर ऑफ ॲटर्नी देऊ शकता. त्याचवेळी पॉवर ऑफ ऍटर्नी करताना लक्षात घ्या की त्याची कायदेशीररित्या नोंदणी करा. याव्यतिरिक्त, अटींमध्ये दुसऱ्या व्यक्तीला कोणकोणते अधिकार असतील हेही स्पष्ट नमूद करा अन्यथा नंतर कायदेशीर वाद उद्भवू शकतात.

Leave a Reply