Daughter’s Right on Father’s Property: मुलींना मालमत्तेचा अधिकार देण्यासाठी कायदे करण्यात आले आहेत. 2005 पासून वडिलांच्या मालमत्तेत मुलांप्रमाणे मुलांनाही समान हक्क देण्यात आले आहेत. याआधी मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर कोणताही हक्क नव्हता पण, सरकारने 2005 मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात सुधारणा करून मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क दिले गेले.
वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार, एकाच प्रकरणात नाही करू शकत दावा (फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली : भारतीय परंपरेत मुलींना मुलांपेक्षा उच्च स्थान दिले जाते. घरात मुलगी जन्माला आली की घरात ‘लक्ष्मी’ आली असे म्हटले जाते पण, जेव्हा याच मुलींना त्यांचे हक्क देण्याचा प्रश्न येतो तेव्हा या भारतीय समाजाचे दुहेरी चरित्र समोर येते. मुलांप्रमाणे मुलींनाही संपत्तीत समान हक्क देण्यासाठी भारत सरकारने कायदे आणि नियम केले आहेत. आपण कायद्यानुसार मुलींना मालमत्तेत कोणते अधिकार दिले जातात. याशिवाय, या लेखात आपण कोणत्या परिस्थितीत मुलीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळत नाही हेही पाहूया.
वडिलांच्या संपत्तीत मुलींचा अधिकार किती?
मुलींनाही आता वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क दिले गेले आहेत. 2005 मध्ये सरकारने कायद्यात सुधारणा केली तरीही आजही लोकांमध्ये याबाबत गोंधळाची स्थिती पाहायला मिळते. समाजातील मुली सामान्यतः त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर दावा करण्यास कचरतात. यामुळे, कायद्यात सुधारणा करूनही त्यांना त्यांचे हक्क मिळू शकत नाहीत. याबद्दल कायदा काय म्हणतो जाणून घेऊया.
2005 मध्ये कायद्यात बदल
समाजाच्या बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थिती लक्षात घेता सरकारने 2005 मध्ये एक मोठे पाऊल उचलले. त्यानंतर हिंदू वारसाहक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि मुलींना वडिलांच्या मालमत्तेवर मुलांइतकाच अधिकार देण्यात आला. तसेच मुलगी विवाहित असो वा अविवाहित, तिला वडिलांच्या मालमत्तेत भावाप्रमाणेच हक्क असेल. कायद्यातील या दुरुस्तीमुळे दशकांपासून प्रचलित असलेल्या विचारसरणीत बदल होईल अशी आशा होती.
वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान हक्क
हिंदू वारसाहक्क कायद्यात सुधारणा झाल्यानंतर मुलीला केवळ स्वतःच्या कमाईतच नाही तर वडिलोपार्जित मालमत्तेतही हक्क दिले गेले. म्हणजे वडिलांच्या कमाईतील खरेदी केलेल्या मालमत्तेत मुलीचा मुलाइतकाच हक्क असतो. तसेच, वडिलांना वारसाहक्काने कोणती मालमत्ता मिळाली असेल तर मुलीचाही त्यात सामान हक्क असेल. 2005 मध्ये झालेल्या दुरुस्तीआधी विवाहित मुलींना वारसाहक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवर मर्यादित किंवा कोणताही अधिकार नव्हता. 2005 मध्ये हा फरक रद्द करण्यात आला.
वडिलांचा मृत्युपत्रात मुलीला मालमत्ता देण्यास नकारवडिलांनी मृत्यूआधी इच्छापत्र केले असेल तर कायदा वेगळा आहे. वडिलांना मृत्युपत्रात इच्छेनुसार मालमत्तेचे विभाजन करण्याचा अधिकार असून मृत्युपत्रात वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर फक्त मुलांचाच अधिकार असेल असं नमूद केलं असेल तर मुली त्याला आव्हान देऊ शकत नाहीत. लक्षात घ्या की वडिलोपार्जित मालमत्तेवर हा नियम लागू होणार नाही.