ITR Filing 2025: आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण, तुम्ही आयकर पोर्टलचा पासवर्ड विसरला असाल तर काळजी करण्याची गरज नाही. होय, नोकदार करदाते इन्कम टॅक्स पोर्टलवर लॉग-इन न करताही त्यांचा आयटीआर दाखल करू शकतात.
मुंबई : सध्या देशात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचा हंगाम सुरु आहे आणि नोकरदार लोक आयकर रिटर्न भरण्यासाठी त्यांचे कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त आहेत. तुम्ही 2024-25 या आर्थिक वर्षासाठी तुमचा ITR भरण्यास तयार असाल तर, आयकर पोर्टलचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड विसरला तर घाबरायची गरज नाही. तुम्ही याशिवायही तुमचा ITR त्वरित दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नेट बँकिंगची आवश्यकता असेल.
पासवर्ड विसरला तर ITR फाईल कसा करायचा?15 जूननंतर बहुतेक पगारदार लोक आयटीआर फायलिंग सुरु करतात, पैकी काही स्वतःहून आयकर विवरणपत्र दाखल करतात तर काहीजण CA ची मदत घेऊन आपला टॅक्स फाईल करतात. पण, जर तुम्ही आयकर ई-फायलिंग पोर्टलचा पासवर्ड विसरलात तर काय होईल? पासवर्ड विसरलात तरी घाबरण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला तुमचा पासपोर्ट रिसेट करण्याचे सोपे मार्ग सांगणार आहोत.
इन्कम टॅक्स पोर्टल पासवर्ड विसरलात? कसा रीसेट करायचा?http://www.incometax.gov.in या आयकर पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.पहिली पद्धत: ‘फॉरगॉट पासवर्ड’ पर्याय वापरा
– सर्वप्रथम आयकर ई-फायलिंग पोर्टलवर जा.
– आता लॉगिन पेजवरील ‘पासवर्ड विसरलात’ लिंकवर क्लिक करा. – यानंतर पॅन नंबर आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा तुमचा नोंदणीकृत ई-मेल आयडी टाका.
– यानंतर एक वन-टाइम पासवर्ड मिळेल, जो तुम्ही नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी टाकू शकता.
दुसरी पद्धत: आधार ओटीपी द्वारे
तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक केलेले असेल, तर ‘Reset Passward’ मध्ये जाऊन आधार ओटीपी पर्याय निवडा. यानंतर, ओटीपी मिळवा आणि एक नवीन पासवर्ड तयार करा.
तिसरी पद्धत: नेट बँकिंगद्वारे
तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा नसेल तर, नेट बँकिंग वापरून आयकर पोर्टलवर लॉग इन करा. SBI, HDFC, ICICI, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक आणि फेडरल बँक सारख्या अनेक बँका ही सुविधा देतात.
चौथी पद्धत: डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र वापरा
तुमच्याकडे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र असेल, तर तुम्ही लॉगिन करण्यास आणि आयटीआर दाखल करण्यासाठी वापरू शकता.
तुम्ही तुमचा पासवर्ड रीसेट करू शकत नसाल तर काय करावे?
अनेक वेळा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी अपडेट न झाल्यामुळे पासवर्ड रीसेट करताना अडचणी येतात. अशा परिस्थितीत, आयकर पोर्टलच्या ‘मॅनेज युअर अकाउंट’ सेक्शनमध्ये जा आणि तुमचे तपशील अपडेट करा. सर्व माहिती बरोबर आहे का तपासा आणि आधार-पॅन लिंक केलेला नसेल, तर पॅन आधारशी लिंक करा.
याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या आयकर कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा 1800-103-0025 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.