sebi launches cdsl s multi lingual initiatives for ease of doing business

https://www.loksatta.com/business/finance/sebi-launches-cdsl-s-multi-lingual-initiatives-for-ease-of-doing-business-print-eco-news-zws-70-4167477/

Clipped from: https://www.loksatta.com/business/finance/sebi-launches-cdsl-s-multi-lingual-initiatives-for-ease-of-doing-business-print-eco-news-zws-70-4167477/

गुंतवणूकदारांसाठी ‘सीडीएसएल’च्या दोन नवीन सुविधा

सध्या सुरुवातीला चार भाषांमध्ये माहिती देऊन हा चॅटबॉट अहोरात्र अथकपणे गुंतवणूकदारांच्या अडीअडचणीत त्यांच्या मदतीसाठी सज्ज असेल.

sebi launches cdsl s multi lingual initiatives

(Image: CDSL/facebook

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबई: रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेली आशियातील पहिली भांडवली बाजारात सूचिबद्ध डिपॉझिटरी सेवा असलेल्या ‘सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड – सीडीएसएल’ दोन वैशिष्ट्यपूर्ण बहुभाषिक उपक्रमांची नुकतीच घोषणा केली. यातून भांडवली बाजाराच्या सर्वसमावेशकतेत भर पडण्यासह, गुंतवणूकदारांना व्यवहारात सुलभतेसाठी ते मदतकारक ठरण्याची अपेक्षा आहे.

दोन नवीन सुविधांमध्ये २३ वैविध्यपूर्ण भारतीय भाषांमधून खाते विवरण आणि बहुभाषिक चॅटबॉट यांचा समावेश असून, बाजार नियामक ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी येथे आयोजित रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्याचे अनावरण केले.

हेही वाचा >>> आता टाटांच्या ‘या’ कंपनीत होणार नोकर कपात; ३ हजार जणांचे रोजगार जाणार

गुंतवणूकदारांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत त्यांच्या डिमॅट खात्यातील रोख्यांची एकत्रित माहिती पुरवणारा ‘आपका कॅस – आपकी जुबानी’ हा उपक्रम व्यवहार-सुलभतेसाठी पडलेले पाऊल आहे. शिवाय सीडीएसएलच्या वेबसाइटवर एक वैशिष्ट्यपूर्ण बहु-भाषिक चॅटबॉट सुविधा सुरू करण्यात आली असून, गुंतवणूकदारांचा स्वयंपूर्णतेकडे प्रवास त्यायोगे सुलभ केला जाणार आहे. सध्या सुरुवातीला चार भाषांमध्ये माहिती देऊन हा चॅटबॉट अहोरात्र अथकपणे गुंतवणूकदारांच्या अडीअडचणीत त्यांच्या मदतीसाठी सज्ज असेल.

याच कार्यक्रमात, सायबर सुरक्षा आणि गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आर्थिक साक्षरतेसाठी सीडीएसएलच्या सुरू असलेल्या प्रयत्नांची मांडणीदेखील ‘सेबी’ अध्यक्षांपुढे करण्यात आली.

Leave a Reply