Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/

https://www.loksatta.com/business/personal-finance/bank-locker-what-if-the-key-is-lost-is-a-deposit-required-mmdc-mrj-95-4144032/

Clipped from: https://www.loksatta.com/business/personal-finance/bank-locker-what-if-the-key-is-lost-is-a-deposit-required-mmdc-mrj-95-4144032/

बँक लॉकरच्या संदर्भात अनेकदा वेगळ्या बँकेत त्यांच्या नियमानुसार उत्तरे ग्राहकांना दिली जातात. पण खरंच प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असतात का? तज्ज्ञ काय सांगतात, समजून घ्या!

Bank locker What if the key is lost is a deposit required

प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रश्न : बँक लॉकर देण्यासाठी ग्राहकाकडून अनामत रकमेची (डिपॉझिट) मागणी करू शकते का?

उत्तर: होय, बँक तीन वर्षांचे लॉकरचे भाडे व लॉकर ब्रेक- ओपन करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम अशा एकत्रित रकमेची अनामत रक्कम (डिपॉझिट) म्हणून मागणी करू शकते, करेलच असे नाही. ही मागणी ग्राहकाचे बँकेशी असलेले व्यवहार आणि सबंध यावर अवलंबून असते.

स्टॅम्प फी कुणी भरायची?

प्रश्न : लॉकरसाठी नव्याने जे लॉकर अॅग्रीमेंट करावे लागते यासाठीची स्टॅम्प फी कोणी भरायची असते?

उत्तर : लॉकर अॅग्रीमेंटसाठीची स्टॅम्प फी बँकेने भरावयाची असते.

आणखी वाचा-Money Mantra : आर्बिट्राज फंड काय असतो?

प्रश्न :लॉकरमधील चीजवस्तू गहाळ अथवा खराब झाल्यास त्याची बँकेवर काही जबाबदारी असते का व किती?

उत्तर: कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे (उदा: भूकंप, चक्रीवादळ, पूर, अतिवृष्टी, अतिरेकी हल्ला, युद्ध तसेच ग्राहकाचा निष्काळजीपणामुळे जर बँकेच्या लॉकर मधील ग्राहकाच्या चीज वस्तू गहाळ अथवा खराब झाल्या तर त्याची जबाबदारी बँकेवर नसते. मात्र बँक कर्मचाऱ्याने केलेली अफरातफर, चोरी, दरोडा, इमारतीस लागलेली आग यासारख्या कारणाने जर लॉकर मधील चीज वस्तू गहाळ अथवा खराब झाली तर बँक नुकसान भरपाई देण्यास बाध्य असते व ही नुकसान भरपाई ग्राहकाच्या सध्या असलेल्या वार्षिक लॉकर भाड्याच्या १०० पट इतकीच असते.

आणखी वाचा-Money Mantra : डेट म्युच्युअल फंड काय असतो?

किल्ली हरवल्यास…

प्रश्न :बँक लॉकरची किल्ली हरवल्यास काय करावे लागते?

उत्तर: बँक लॉकरची किल्ली हरवल्यास बँकेस शक्य तितक्या लवकर कळविणे आवश्यक असते जर लॉकर एकापेक्षा जास्त नावाने असेल तर सर्व सबंधितांनी सही करू तसा अर्ज बँकेत द्यावा लागतो. यानंतर लॉकर ब्रेक करण्यासाठी बँकेस अनुमती द्यावी लागते. बँकेमार्फत उभयतांच्या सोयीनुसार लॉकर ब्रेक- ओपनची वेळ ठरविली जाते. लॉकर ब्रेक ओपन करताना सबंधित लॉकरचे सर्व लॉकर होल्डर व बँकेचा अधिकारी यांचे समक्ष लॉकर ब्रेक- ओपन करावा लागतो असे करताना आतील चीज वस्तू बाबत इतरांना माहिती होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते व त्यांनतर एकतर आहे त्याच लॉकरची दुसरी किल्ली दिली जाते किंवा उपलब्ध असल्यास नवीन लॉकर दिला जातो. ब्रेक ओपन करण्यासाठीचा येणारा तसेच नव्या किल्ली किंवा नवीन देण्यात येणारा लॉकर यासाठी येणारा सर्व खर्च लॉकरधारकास करावा लगतो.

प्रश्न : एका दिवसात किती वेळा बँक लॉकर ऑपरेट करता येतो व यासाठी वेळ काय आहे ?

उत्तर: दिवसातून कितीही वेळा बँक लॉकर ऑपरेट करता येतो सर्वसाधारणपणे बँक कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही सुविधा वापरता येते.

Leave a Reply