आज वाचलेली बातमी मनाला चटका लावून गेली –अनिल तिकोटेकर

ही बातमी काही डॉक्टर्स बाबत आहे. त्यांनी त्यांचे मन मोकळे करताना प्रांजळपणे कबूल केले आहे की एखादा रुग्ण जेंव्हा त्यांच्या समोर मृत्यूला सामोरे जातो तेंव्हा तेंव्हा ते स्वतःला अतिशय ” असहाय्य ” समजतात. त्यांना ही ” असहाय्य ” अवस्था खूप वेळेस सहन करावी लागते.

निमित्त होते Business Standard ह्या पेपर मध्ये आलेल्या बातमीचे. हा business related बातम्या देणारा पेपर आहे पण जवळ जवळ पाव पान ह्या बातमीने व्यापले होते. माझे साहजिकच लक्ष त्या बातमीकडे गेले व ती संपूर्ण बातमी मी वाचून काढली.

आपण समजतो की डॉक्टर व्यक्तीना मृत्यू काही नवीन नाही. पण तसे नाही. डॉक्टर जेंव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती मरताना पाहतात व त्यांना जेंव्हा जाणीव होते की आपण काही करू शकत नाही तेंव्हा तेंव्हा त्या स्थितीतील डॉक्टर स्वतःच पेशंट बनतात इतके ते कमजोर होतात. इतके कमजोर होतात की त्यांना स्वतःलाच ” मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर ” कडे जाण्याची गरज भासू लागते. हा अनुभव सध्याच्या करोना काळात अजूनच वाढीला लागला आहे.

मुंबईतील ” राणे हॉस्पिटल ” मधील हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर संदीप राणे म्हणतात “Doctors need psychiatrists to handle the trauma they are going through in the face of this pandemic ”

कित्येक डॉक्टर्स असे आहेत की जे आपल्या घरी ६/६ महिने गेलेले नाहीत पण ते करोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांचे शल्य दुहेरी आहे –समोर पेशंट मरत आहे पण काही करू शकत नाही व घरी असलेल्या आप्तांची काळजी करण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही. संपूर्ण बातमी वाचल्यावर मन सुन्न होतेच पण आपण समाजातील घटक म्हणून काहीही करू शकत नाही ही भावना प्रबळ पणे मनात घर करून राहते.

30.04.2021–Exhausted, helpless, doctors struggle to keep sinking health system afloat | Business Standard News

Leave a Reply