१००० कंपन्या चीन सोडून भारतात येण्याच्या विचारात; सरकारशी चर्चा सुरू –महाराष्ट्र टाइम्स

भारत हा आगामी काळात उत्पादन क्षेत्रात पर्यायी हब ठरू शकतो, हा या कंपन्यांचा दृष्टीकोन आहे. यामुळे सरकारकडे विविध पातळ्यांवर आपला प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यात विदेशातील भारतीय दुतावास आणि विविध राज्यांच्या उद्योग मंत्रालयांचा यात समावेश आहे. सध्या जवळपास १००० कंपन्या वेगवेगळ्या स्तरांवर जसे इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल सेल, सेंट्रल गव्हर्नमेंट डिपोर्टमेट्स आणि राज्य सरकारांशी चर्चा करत आहेत.

१००० कंपन्या चीन सोडून भारतात येण्याच्या विचारात; सरकारशी चर्चा सुरू
नवी दिल्लीः उत्पादनासाठी जागतिक कंपन्यांची पहिली पसंत चीन आहे. पण चीनच्या डोक्यावरील मानाचा हा ताज आता भारताचा होण्याची शक्यता आहे. करोना व्हायरसच्या संसर्गाने निर्माण झालेल्या समस्यांमुळे चीनमधील जवळपास १००० हजार कंपन्या भारतात येण्याच्या विचारात आहेत. भारतात आपले कारखाने उभे करण्यासाठी या कंपन्यांनी सरकारमधील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. बिजनेस टुडेने ही बातमी दिली आहे. यापैकी कमीत कमी ३०० मोबाइल कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल डिव्हाइसेस, टेक्सटाइल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्स क्षेत्रातील कंपन्यांना भारतात कारखाने उभारण्यासाठी सरकारशी सक्रीय स्वरुपात संपर्कात आहेत. या कंपन्यांशी बातचीत यशस्वी झाली. तर हा चीनला मोठा झटका असेल.

सरकारला मिळाला प्रस्ताव

भारत हा आगामी काळात उत्पादन क्षेत्रात पर्यायी हब ठरू शकतो, हा या कंपन्यांचा दृष्टीकोन आहे. यामुळे सरकारकडे विविध पातळ्यांवर आपला प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यात विदेशातील भारतीय दुतावास आणि विविध राज्यांच्या उद्योग मंत्रालयांचा यात समावेश आहे. सध्या जवळपास १००० कंपन्या वेगवेगळ्या स्तरांवर जसे इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल सेल, सेंट्रल गव्हर्नमेंट डिपोर्टमेट्स आणि राज्य सरकारांशी चर्चा करत आहेत. या पैकी ३०० कंपन्यांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीय केलं आहे, असं केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं.

करोना रोगरागई गेल्यावर मोठा बदल

करोना व्हायरस नियंत्रणात आल्यावर आपल्यासाठी अनेक फलदायी गोष्टी समोर येतील. भारत हा उत्पादन क्षेत्रातील एक मोठा पर्याय म्हणून जागतिक पातळीवर समोर येईल. जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियासारखे देश चीनवर प्रमाणपेक्षा अधिक अवलंबून आहे आणि हे स्पष्टपणे दिसतंय, असं ते अधिकारी पुढे म्हणाले.

खनिज तेल स्वस्त : २२ वर्षांतील नीचांकी स्तर

लॉकडाउन: आज पासून काय सुरू, काय बंद?

देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार गेल्या सप्टेंबरपासून मोठे निर्णय घेत आहे. कॉर्पोरेट करात कपात करून २५.१७ टक्क्यांवर आणला आहे. नवी कारखाने उभे करणाऱ्यांचा कॉर्पोरेट कर कमी करून १७ टक्के इतका केला आहे. हा कर दक्षिण पूर्व आशियात सर्वांत कमी आहे. कॉर्पोरेट करातील कपातीसबोतच देशात लागू केलेल्या जीएसटीमुळे देशातील उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक भारताला अपेक्षित आहे.

via Production in India : १००० कंपन्या चीन सोडून भारतात येण्याच्या विचारात; सरकारशी चर्चा सुरू – coronavirus pandemic 1000 foreign companies mull production in india | Maharashtra Times

Leave a Reply