– आमच्या वडिलांनी २०११ मध्ये पिंपरी चिंचवड येथे स्वतःच्या नावे फ्लॅट खरेदी केला. त्यासाठी आम्ही गृहकर्ज़ पण घेतले. दुर्दैवाने अवघ्या दोन महिन्यांत त्यांचे निधन झाले. आता या घटनेला ५ पेक्षा जास्त वर्षे झाली. त्यांच्या पश्चात माझी आई, मी आणि माझा लहान भाऊ असे तीन वारस आहोत. गृहकर्ज़ पण आम्ही वेळच्या वेळी फेडत आहोत. आता आम्हाला तो फ्लॅट आईच्या नावे करून भाड्याने द्यायचा आहे.
वडील सरकारी नोकरीत होते त्यामुले पेन्शनसाठी आम्ही न्यायालयातून आईच्या नावे ‘एअरशिप सर्टिफिकेट’ काढले आहे. त्याचा वापर आपल्याला गृहमालकी हस्तांतर करण्यासाठी होईल का? नसेल तर योग्य तो मार्ग सुचवावा.
– प्रमोद कोकणे
Shop your favourite brand & get best deals
Ad: watches house- घर बैठे सिर पर बाल उगाना हुआ बेहद आसान, अपनाएं 1 देसी नुस्खा
Ad: refollium
Recommended By Colombia
उत्तर
तुमच्या दिवंगत पित्याच्या नावावर असलेला फ्लॅट तुम्हाला कायद्याने आईच्या नावावर करून घेता येईल. यासाठी तुम्ही न्यायालयातून आणलेल्या ‘एअरशिप सर्टिफिकेट’ची आवश्यकता नाही. तुम्हीही या मालमत्तेचे वारस असल्याकारणाने तुमच्याकडून ‘ना हरकत’ दाखला आदी अटी सोसायटी टाकू शकते. सर्वसाधारणतः सोसायटीने व्यवहारकर्तव्य म्हणून नवऱ्याच्या नावावर असलेला फ्लॅट त्याच्या पत्नीच्या नावे करणे आवश्यकच ठरते.
..
प्रश्न
मी सोसायटीत एक सदनिका खरेदी केली आहे, पण तो व्यवहार परस्पर झाल्याने कोणाला (सचिवाला) दलाली मिळाली नाही म्हणून त्याने मला त्या सदनिकेसाठी सदस्यत्व देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्या सदनिकेला कोणीही सभासद नाही. त्यासंदर्भात आपले मार्गदर्शन मिळाल्यास आभारी होईन.
– सुनीता दाते.
उत्तर
तुम्ही ज्याअर्थी सदर सोसायटीत फ्लॅट खरेदी केला असे म्हटले आहे, त्या अर्थी करार तुमच्या नावे आहे, असे मी गृहित धरतो. तसेच, सदर फ्लॅट विकताना खरेदीदाराने सोसायटीकडून ना हरकत दाखला घेतला हेही गृहित धरतो. असे असल्यास तुम्हाला सदस्यत्व मिळायला हवे. तथापि, तुम्ही सदस्यत्वासाठी अर्ज करणे, नियोजित शुल्क अदा करणे आदी उपचार पूर्ण केलेत का, याची खातरजमा करायला हवी. तुम्हाला सदस्यत्व देणार की नाकारणार हे सोसायटीने लेखी कळविणे सोसायटीचे कर्तव्य आहे. ते तुमचा अर्ज असाच दुर्लक्षित सुद्धा करू शकतात. महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायदा १९६० अंतर्गत सदस्यात्वाचा अर्ज नाकारल्यास अथवा अर्जावर अजिबात निर्णय न घेतल्यास उपाय योजण्यात आले आहेत. सोसायटीचा सेक्रेटरी त्याला व्यवहारातून लाभ झाला नाही या कारणास्तव फ्लॅट खरेदी करणाऱ्यास सदस्यत्व नाकारू शकत नाही.
‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न
‘हाउसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरांत असावा. पाकिटावर ‘हाउसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स टॉवर, ४ था मजला, कमला मिल्स कम्पाउन्ड, लोअर परळ, मुंबई- ४०० ०१३. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.
via housing society column – real estate news in Marathi, Maharashtra Times