Housing Society Members Rights: सोसायटीमधील घराबाहेरची जागा नक्की कुणाची? फ्लॅटबाहेर शू रॅक ठेवला तर शेजारचा विरोध करू शकतो, असा आहे सोसायटीचा नियम

Society Rules: नव्या असो वा जुन्या, शहरांमधील रहिवासी सोसायट्यांमद्ये इमारतीतील कॉमन एरिया पॅसेज नक्की कुणाची? या जागेवर अधिकार कुणाचा अधिकार तसेच, ही जागा सदस्य वापरू शकतात का? यावरून अनेकदा वाद होतात. विशेषतः एखाद्या घर मालक किंवा भाडेकरूने या कॉमन एरियामध्ये शू रॅक म्हणजे चप्पलचे स्टॅन्ड ठेवणं वादाचं प्रमुख कारण असतं.

तुम्ही तुमच्या सोसायटीतील कॉमन एरिया पॅसेजमध्ये शू रॅक ठेवण्याचा विचार असाल, किंवा तुमच्या शेजाऱ्याने ठेवले असेल तर, तुम्हाला खालील नियम आणि उपाय माहिती असले पाहिजे.

सोसायटी कॉमन एरिया, लॉबीचे नियम

मुंबई, ठाणे, बेंगळुरू यासंख्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांमध्ये काही नियमांवरून अनेकदा सोसायटी सदस्य आणि कमिटी यांच्यात वाद होतात. यापैकी काही सोसायटीच्या बैठकीमध्ये सामंजस्याने सोडवले जातात, तर काही वाद कोर्टापर्यंत पोहोचतात. यापैकी सर्वसाधारण वाद म्हणजे की आपल्या घराबाहेरील मोकळ्या जागेत वस्तू किंवा शू रॅक ठेवणे. सोसायटीचे सदस्य आपल्या घराबाहेर बऱ्याच वस्तू ठेवतात, ज्यामुळे शेजाऱ्यांसोबत वाद होतात, तर काही वादांमुळे हाणामारीही होते.

Maharashtra TimesShare Market चा राजा बाजारात येणार! बहुप्रतीक्षित NSE IPO या महिन्याच्या शेवटी मुहूर्त गाठणार, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळया दरम्यान, कुटुंबातील सदस्य आणि पाहुण्यांच्या चपला किंवा बुटांचा कचरा घरात येऊ नये म्हणून अडगळीचं सामान किंवा शू रॅक घराच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत ठेवतात. याच शू रॅकवरून सोसायटींतील सदस्यांमध्ये वाद होतात. आपल्या घराच्या उंबऱ्यापासून बाहेरचा भाग सोसायटीचा कॉमन एरिया पसेक समजला जातो. त्यामुळे, घराचे शू रॅक बाहेर ठेवणं कायदेशीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

शू रॅकवरून सोसायटी घरमालकाला नोटीस पाठवू शकते का?

फ्लॅटच्या बाहेरील पॅसेज, लॉबी किंवा कॉरिडॉर कॉमन एरियाचा भाग मानला जातो आणि तिथे कोणतीही वस्तू कायमस्वरूपी ठेवण्यावर सोसायट्या नियम किंवा निर्बंध घालू शकतात. पण, यासंदर्भात कोणतीही कारवाई सोसायटीच्या लागू bye-laws वर आणि विहित कार्यपद्धतीवर आधारित असली पाहिजे.

म्हणजे आपल्या घराबाहेर जागेत कोणतंही सामान किंवा वस्तू ठेवायची असेल तर सदस्य आणि सोसायटीच्या कमिटीला पहिले बायलॉज आणि मग नियम पाहावे लागतात. शू रॅक किंवा कोणत्याही छोट्या-मोठ्या सामानामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या सदस्यांचा रस्ता अडत असल्यास सोसायटी तुम्हाला ती वस्तू हटवण्याची नोटीस पाठवू शकते.

Maharashtra TimesGold Silver Rate: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण तरी सोन्या-चांदीचा बॅण्ड वाजला, गुंतवणूकदारांचं नुकसान; सध्या खरेदी धोक्याची का?लॉबी आणि फ्री पॅसेजचे महत्त्व
सोसायटी इमारतीमधील लॉबी किंवा कॉरिडॉर आपत्कालीन स्थितीत महत्त्वाचे असतात, त्यामुळे शू रॅक किंवा कोणत्याही इतर वस्तूंमुळे इमर्जन्सीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून काही सोसायट्या कॉमन एरिया पॅसेजमध्ये शू रॅक ठेवायला परवानगी देत नाही.

Maharashtra TimesPost Office Scheme: पैशांवर पैसाच पैसा! बँकेपेक्षा जास्त फायदा; फक्त व्याजातून मिळवा 6 लाख रुपये, पोस्ट ऑफिसची सुपरहिट स्कीममात्र, घरा बाहेरील शू रॅक आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडथळा निर्माण करत नसतील किंवा ये-जा करणाऱ्यांना अडचण होत नसल्यास सोसायटी आक्षेप घेऊ शकत नाही. म्हणजे सोसायटीच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये ठराव मांडून चप्पलचे स्टॅन्ड घराबाहेर ठेवायला बहुमताने परवानगी मिळाली, पण फायर सिक्युरिटी रूल न पाळता प्रस्ताव मान्य केल्यास बेकायदेशीर आणि अवैध ठरवला जाऊ शकतो.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला. पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव 2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या. 2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले. शैक्षणिक पात्रता​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा

Leave a Reply