Property Rights : पालकांनी आपले घर किंवा इतर मालमत्ता मुलाच्या नावे केली असेल, तर मुलगी आपला हक्क सांगू शकते का? असा अनेकदा प्रश्न उपस्थित होतो. काही प्रकरणांमध्ये याचे उत्तर हो, तर काहींमध्ये नाही असून प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
अशा प्रकरणांमध्ये मालमत्ता कोणाच्या नावावर आहे फक्त इतकं ठरवणं पुरेसं नाही. मालमत्तेवरील मुलीचे हक्क मालमत्ता वडिलोपार्जित आहे की पालकांच्या स्वतःच्या कमाईतून खरेदी केली आहे, मालमत्तेचे हस्तांतरण कसे झाले आणि वैध मृत्युपत्र आहे की नाही यावरही अवलंबून असतात.
मालमत्तेचे मूल्य लाखो किंवा करोडो रुपयांमध्ये असेल तर विकण्याआधी, हस्तांतरित करण्यापूर्वी किंवा विभागणी करण्यापूर्वी या कायदेशीर बाबी समजून घेतल्या पाहिजे ज्यामुळे भविष्यात होणारे मोठे कौटुंबिक वाद टाळता येऊ शकतील.
आजोबांच्या प्रत्येक संपत्तीवर नातवाचा हक्क नसतो! पैतृक वारशाचे नियम झाले आणखीन कठोर
मालमत्ता वडिलोपार्जित किंवा संयुक्त मालकीची असल्यास काय?
- मालमत्ता वडिलोपार्जित किंवा संयुक्त मालकीची असेल, तर मुलीचे हक्क वेगळे असू शकतात. हिंदू संयुक्त कुटुंबात मुलाप्रमाणेच मुलीलाही जन्माने सहमालकी हक्क मिळू शकतात.
- म्हणजे केवळ लग्न झाले किंवा पालकांना मालमत्ता मुलाला देण्याची इच्छा आहे म्हणून मुलीचे कायदेशीर हक्क संपत नाही.
- तसेच अशा मालमत्तेच्या बाबतीत मुलीला मुलाप्रमाणेच समान हक्क आणि जबाबदाऱ्या असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, प्रत्येक प्रकरणात मालमत्तेची कागदपत्रे, पूर्वीची विभागणी आणि कोणतेही हस्तांतरण नीट चेक केले पाहिजे.
Real Estate Property Selling: 1 कोटींचे घर 1.8 कोटींना विकले, तरी खिसा रिकामाच; समजून घ्या स्मार्ट गुंतवणूकदार कसे बनावे? छुपे गणित नक्कीच तुम्हाला ठाऊक नसेल
पालकांनी स्वतः च्या पैशांनी मालमत्ता खरेदी केली असेल तर?
दिशा सालियानच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंना दिलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय?
दुसरीकडे, पालकांनी स्वतःच्या कमाईतून घर किंवा जमीन खरेदी केली असेल, त्याला सामान्यतः स्व-अर्जित मालमत्ता मानली जाते. अशा मालमत्तेसाठी नियम वडिलोपार्जित मालमत्तेच्या नियमांपेक्षा वेगळे असू शकतात.
अशा मालमत्तेच्या मालकाला कायद्यानुसार विकण्याचा, भेट देण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा अधिकार असतो आणि मृत्युपत्राद्वारे मृत्यूनंतर मालमत्तेचा वारसा कोणाला मिळेल हेही ठरवू शकतात.
त्यामुळे केवळ मुलगी असली तरी वडील जिवंत असताना त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेपैकी अर्धा वाटा मुलींना आपोआप मिळेल, असं गृहीत धरणे योग्य नाही.
New Labour Codes: 21000 पगारावर मिळणार घसघशीत बोनस, पण कोणाला फायदा? 12000 किमान पगारावर असं असेल बोनसचे Calculation
पालक आपली संपत्ती मुलाला देऊ शकतात का?
पालकांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून मालमत्ता खरेदी केली असेल आणि कायदेशीर मालक असतील, तर सामान्यतः त्यांना त्या मालमत्तेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो. म्हणजे पालक आपल्या मालकीची संपत्ती कोणाच्याही परवानगीशिवाय विकू शकतात, भेट देऊ शकतात किंवा मृत्युपत्राद्वारे दुसऱ्या कोणाला तरी वारसा म्हणून देऊ शकतात.
त्यामुळे, केवळ मुलगी असल्यामुळे, पालक जिवंत असताना स्व-अर्जित मालमत्तेत आपोआप अर्धा हिस्सा मिळण्याचा हक्क मिळत नाही. वडिलोपार्जित/सहमालक मालमत्तेसाठी नियम वेगळे असू शकतात. म्हणून मालमत्तेचा प्रकार आणि मालकाने वैध मृत्युपत्र किंवा मालमत्तेचे हस्तांतरण केले आहे की नाही, याचा विचार केला पाहिजे.
मालमत्ता आधीच मुलाला दिली असेल तर?
पालकांनी कायदेशीररित्या मालमत्ता मुलाच्या नावावर हस्तांतरित केली, जसे की रजिस्टर्ड गिफ्टद्वारे, तर परिस्थिती वेगळी आहे. केवळ मुलीच्या नावाच्या आधारावर प्रत्येक अशा हस्तांतरणाला आव्हान देता येत नाही.
मात्र मालमत्तेचे स्वरूप, मूळ मालक कोण होता आणि हस्तांतरण योग्यरित्या झाले आहे की नाही, याचीही खात्री केली पाहिजे. यामुळे भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास मालमत्ता किंवा वारसा कायद्यात तज्ञ असलेल्या वकिलाकडून कागदपत्रे तपासली पाहिजे.
कौटुंबिक वाद टाळायला पालकांकडे कोणते पर्याय
अशा परिस्थितीत, पालकांना भविष्यात मालमत्तेची विशिष्ट प्रकारे विभागणी करायची असल्यास केवळ तोंडी आश्वासनांवर अवलंबून राहू नये आणि कायदेशीर कागदपत्रांद्वारे आपल्या इच्छा स्पष्ट केल्या पाहिजे.
यासाठी मृत्युपत्र बनवणे सर्वात उपयुक्त पर्याय असू शकतो. तसेच, मालमत्तेची सगळी कागदपत्रे सुरक्षित ठेवली पाहिजे आणि कोणती मालमत्ता स्व-अर्जित आहे व कोणती वडिलोपार्जित/सहमालकीची हेही स्पष्ट नमूद केले पाहिजे. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 30 नुसार काही विशिष्ट मालमत्ता मृत्युपत्राद्वारे हस्तांतरित केल्या जाऊ शकतात.
याशिवाय मालमत्तेची किंमत जास्त असेल तर मृत्युपत्र, दानपत्र, कौटुंबिक समझोता किंवा वाटणीपत्र यांसारखी कागदपत्रे तयार करण्याआधी पात्र मालमत्ता किंवा वारसा हक्क वकिलाचा सल्ला घेतला पाहिजे जेणेकरून भविष्यात कौटुंबिक वादांचा धोका कमी होऊ शकेल.

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला. पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव 2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या. 2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले. शैक्षणिक पात्रताप्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा