RBI Rate Hike: वाढत्या महागाईची चिंता रिझर्व्ह बँकेलाही सतावत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जगाला महागाईच्या रूपात मोठी किंमत मोजावी लागत आहे. पश्चिम आशियातील या संघर्षामुळे एकीकडे कच्च्या तेलाच्या जगभर होणाऱ्या पुरवठा खंडित झाला ज्यामुळे क्रूड आणि इंधनाच्या किंमती वाढल्या तर, ट्रम्प आणि इराणमध्ये वाटाघाटी होताना पाहून महागाईचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे दिसू लागली पण, दोन्ही पक्षातील चर्चा फिस्कटली आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलाच्या प्रवाहात पुन्हा अडथळा निर्माण झाला.
यामुळे वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना फेडरल रिझर्व्हचे अनुसरण करून कदाचित आरबीआयही व्याजदरवाढीचा सपाटा लावू शकते. अशा परिस्थितीत, पुढील काही महिन्यांत तुम्ही नवीन कर्ज घेणार असाल किंवा आधीच घेतलेलं असेल तर सर्वसामान्यांचा महाग व्याज दरांमुळे ईएमआयचा हप्ता वाढू शकतो.
बँकांची कर्जे महागणार?
होय, बँकांची कर्जे महागण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक 2026-27 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 5.75 ते 6 टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढ करू शकते. मजबूत आर्थिक विकासात बँकिंग प्रणालीतील अतिरिक्त लिक्विडीटी नियंत्रित करण्यासाठी आरबीआय दरवाढीचा धमाका करू शकते. युनियन बँक ऑफ इंडियाने अलीकडेच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, वाढत्या महागाईला आळा घालणेही या दरवाढीचा उद्देश असून डिसेंबरमध्ये व्याजदर वाढीचा ट्रेंड सुरू होऊ शकतो.
मध्यवर्ती बँकेने दोन ते तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 25 बेसिस पॉइंट्स म्हणजे किमान 0.25 टक्के व्याजदर वाढ करण्याचा युनियन बँकेचा अंदाज समोर आला आहे. मजबूत आर्थिक वाढ, वाढती महागाई आणि जगभरातील कठीण होत चाललेली वित्तीय परिस्थिती पाहता, व्याजदर वाढवण्याचा पर्याय आता पुन्हा विचारात घेतला जात असल्याचे या अहवालात पुढे नमूद केले आहे.
00:05 / 11:25
India’s GDP Growth at 7.8%: भरारी की भ्रम? विकासदर वाढला, आपल्या खिशात काय? नोकरी, पगार अन् महागाई..
Gold Silver Rate: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण तरी सोन्या-चांदीचा बॅण्ड वाजला, गुंतवणूकदारांचं नुकसान; सध्या खरेदी धोक्याची का?तसेच व्याजदर वाढीचा मुख्य अंदाज डिसेंबरसाठी असला तरी, अहवालात ऑक्टोबरमध्ये दरवाढीची शक्यता पूर्णपणे नाकारली नाही. UBI ने अहवालात पुढे म्हटले आहे की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढवले आणि आरबीआयने प्रथम टिकाऊ उपायांद्वारे अतिरिक्त तरलता सामावून घेतल्यास ऑक्टोबरमध्ये व्याजदर वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बँकिंग प्रणालीमध्ये परकीय निधीचा ओघ का वाढला?
आरबीआयच्या एका विशेष योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत देशात अंदाजे 136 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली, ज्यामध्ये अनिवासी ठेवींच्या (FCNR-B) स्वरूपात मोठा हिस्सा देशात आला. देशात परकीय निधीचा वेगाने वाढणारा ओघ रिझर्व्ह बँकेच्या या कठोर उपाययोजनेमागील मुख्य कारण मानले जात आहे.
Share Market चा राजा बाजारात येणार! बहुप्रतीक्षित NSE IPO या महिन्याच्या शेवटी मुहूर्त गाठणार, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ
अशाप्रकारे, डॉलरच्या या प्रचंड ओघामुळे भारतीय बँकांकडील रोख रकमेत लक्षणीय वाढली असून जूनच्या मध्यापर्यंत 4.82 लाख कोटी रुपये असलेला मुख्य रोख साठा, ऑगस्टच्या मध्यापर्यंत वाढून 8.05 लाख कोटींवर पोहोचला. रुपयाच्या लिक्विडीटीच्या या ओघाचे व्यवस्थापन करणे आरबीआयपुढील सर्वात मोठे आव्हान बनले.

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला. पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव 2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या. 2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले. शैक्षणिक पात्रताप्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा