Google Maps Cache Clear steps to fix Phone Storage Problem: जर तुमच्या फोनमधील स्टोरेज अचानक कमी होऊ लागले असेल, तर केवळ फोटो, व्हिडिओ आणि मेसेजिंग ॲप्स डिलिट करून चालणार नाही. कारण जर तुम्ही नियमितपणे ‘ऑफलाइन मॅप्स’ वापरत असाल किंवा तुमच्याकडे अनेक वर्षांचा ‘लोकेशन डेटा’ साठलेला असेल तर ‘गूगल मॅप्स’ (Google Maps) देखील तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त स्टोरेज वापरत असल्याची शक्यता आहे.
हे नेव्हिगेशन ॲप बॅकग्राउंडला चालणाऱ्या विविध फिचर्समुळे अधिक स्टोरेज वापरू शकते. डाउनलोड केलेले ऑफलाइन मॅप्स, फोनवर साठवलेली ‘टाइमलाइन’ माहिती आणि ‘कॅश्ड मॅप डेटा’ या सर्वांमुळे गूगल मॅप्स तुमच्या फोनमधील अधिकचे स्टोरेज वापरत असते.
पण, तुमच्यासाठी समाधनकार बब अशी आहे की, ॲप अनइन्स्टॉल न करताही यातील बऱ्याचशा स्टोरेजचा आढावा घेऊन ते कमी करता येते.
STORIES YOU MAY LIKE
गूगल मॅपचा डेटा कसा कमी करायचा
प्रथम तुमचे ऑफलाइन मॅप्स तपासा
तुम्ही वारंवार भेट देत असलेल्या शहरांचे मॅप्स डाउनलोड केले असल्यास, ते कदाचित मोठ्या प्रमाणात स्टोरेज वापरत असण्याची शक्यता आहे. डेटा कमी करण्यासाठी, गूगल मॅप्स उघडा, तुमचे प्रोफाइल पिक्चर आणि ऑफलाइन मॅप्सवर टॅप करा आणि तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केलेल्या शहरांचे मॅप्स तपासा. यातून तुम्ही यापुढे आवश्यक नसलेले मॅप्स डिलिट करू शकता.
गूगल मॅप्सची टाइमलाइन देखील स्टोरेज वापरू शकते
गूगल मॅप्सची टाइमलाइन तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांची आणि तुम्ही निवडलेल्या मार्गांची माहिती सेव्ह करते. गूगलच्या म्हणण्यानुसार, टाइमलाइनचा डेटा प्रत्येक साइन-इन केलेल्या डिव्हाइसवर सेव्ह केला जातो, तसेच युजर्स गूगलच्या सर्व्हरवर एनक्रिप्टेड बॅकअप देखील ईनएबल करू शकतात.
जर तुमच्याकडे अनेक वर्षांचा लोकेशन हिस्ट्री असेल, तर तुमची टाइमलाइन तपासा आणि जुनी माहिती डिव्हाइसवर ठेवण्याची गरज आहे की नाही हे ठरवा. डेटा डिलीट करण्यापूर्वी, जर तुम्हाला तुमची टाइमलाइन सेव्ह करायची असेल, तर आधी तिचा बॅकअप घ्या.
गूगल मॅप्सची कॅशे क्लिअर करा
Android वर गूगल मॅप्सची कॅशे कशी क्लिअर करावी
इतर कोणत्याही Android ॲपची कॅशे क्लिअर करता तशीच, ‘सेटिंग्ज’ ॲपचा वापर करून तुम्ही गूगल मॅप्सची कॅशे क्लिअर करू शकता.
- १. सेटिंग्ज ॲप सुरू करा आणि नंतर ॲप्सवर टॅप करा.
- २. सी ऑल ॲप्सवर टॅप करा.
- ३. ॲप्सच्या यादीत खाली स्क्रोल करा आणि मॅप्सवर टॅप करा.
- ४. ॲप माहितीच्या पेजवर, स्टोरेज आणि कॅशेवर टॅप करा.
- ५. कॅशे क्लिअर करा वर टॅप करा.
हेही वाचा
iPhone वर गूगल मॅप्सची कॅशे कशी क्लिअर करावी
Android प्रमाणे ‘सेटिंग्ज’मध्ये जाऊन एखाद्या ॲपची कॅशे साफ करण्याची सुविधा Apple देत नाही. म्हणूनच गूगलने गूगल मॅप्स ॲपमध्येच कॅशे साफ करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- १. गूगल मॅप्स ॲप सुरू करा.
- २. वरच्या उजव्या कोपऱ्यातील तुमच्या अकाउंट आयकॉनवर टॅप करा आणि त्यानंतर पॉप-अप मेनूमध्ये ‘सेटिंग्ज’ वर टॅप करा.
- ३. खाली स्क्रोल करा आणि ‘About, terms & privacy’ वर टॅप करा.
- ४.’Clear application data’ वर टॅप करा आणि त्यानंतर याची खात्री करण्यासाठी ‘ओके’ वर टॅप करा.