घरभाड्यावर TAX सूट हवी असेल तर ही 4 कागदपत्रे जपून ठेवा! बनावट Rent Receipt देणारे आयकर विभागाच्या रडारवर

https://maharashtratimes.com/business/business-news/itr-filing-2026-4-hra-claim-documents-needed-to-avoid-income-tax-notice/articleshow/132701659.cms

Income Tax: नोकरी करणाऱ्या करदात्यांना 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे तर, त्यानंतर 1000 रुपयेपासून ते 5000 रुपयांपर्यंत दंड भरून आयकर विवरणपत्र दाखल करावे लागेल. आयटीआर दाखल करताना नोकरदार करदात्यांना, जे भाड्याने दुसऱ्या घरात राहात आहेत, HRA सवलतीचा दावा करू शकतात.

तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार आयटीआर दाखल करत असाल, तर सॅलरी स्लिपमधील HRA पगारदार कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा कर बचतीचा फायद्याचा उपाय आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि आयकर कायद्यानुसार HRA कर सवलतीसाठी पात्र असाल, तर तुमच्याकडे 4 आवश्यक कागदपत्रे असली पाहिजे.

Maharashtra Timesइकडे भारतात Share Market सुस्साट, चिनी कंपनीची धूम, तिकडे कोरियाचा KOSPI धारातीर्थ! आव्हाने पेलून IT स्टॉक्सची झेप

HRA दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आयकर विभाग HRA सवलतींतर्गत फसव्या भाडे दाव्यांवर कडक नजर ठेवून असून अनेकदा चुकीच्या पॅन कार्ड किंवा रोख रक्कम भरल्याच्या पुराव्याअभावी करदात्यांना नोटिसा पाठवल्या जातात. त्यामुळे, अचूक नोंदी आणि भाड्याच्या पावत्या जपून ठेवल्यास करदात्यांना कोणत्याही कायदेशीर डोकेदुखीशिवाय कर बचतीचा लाभ घेता येऊ शकतो. अशा परिस्थतीत, तुम्ही घरभाडे भत्ता सवलतीचा दावा करत असाल किंवा केला असेल तर 4 महत्त्वाचे दस्तऐवज जपून ठेवा.

वैध भाडेकरार

तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर सर्वप्रथम घर मालकाशी वैध भाडेकरार करा. या करारात भाड्याची रक्कम, भाडेकरू आणि घरमालकाचा संपूर्ण तपशील तसेच त्यांचे पॅन कार्ड क्रमांक प्रविष्ट करा. दरमहिन्याला 50000 रुपयांपेक्षा जास्त भाडे भारत असाल तर, भाड्यातून टीडीएस (TDS) कापून घ्या.

Maharashtra TimesIndia LPG Imports: भारताने इंधन धोरणच बदलले! स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल, LPG ची चिंता मिटणार? सरकारचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न

  • भाड्याची पावती

भाडे करारासोबतच भरलेल्या मासिक किंवा त्रैमासिक भाड्याची पावतीदेखील जपून ठेवा. रेंट रिसीट तुम्ही घरमालकाला खरोखरच भाडे दिल्याचा ठोस पुरावा असतो. तुमच्या नियोक्त्याकडे HRA दावा सादर करताना किंवा आयकर विभागाकडून चौकशी केली गेल्यास या पावत्या आवश्यक असतात. त्यामुळे, या पावत्यांवर घरमालकाची सही असल्याची खात्री करा.

  • ऑनलाइन भाडे भरल्याचे बँक स्टेटमेंट

इन्कम टॅक्स तज्ज्ञ अनेकदा कॅशऐवजी UPI, नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे घरभाडे देण्याचा सल्ला देतात. व कॅश भरल्याचे सिद्ध करणे कठीण आहे, पण बँक स्टेटमेंटवर नोंदवलेली भाडे हस्तांतरणाची नोंद एक खात्रीशीर पुरावा असतो, जो इन्कम टॅक्स अधिकारी नाकारू शकत नाही.

Maharashtra TimesEPF Withdrawal Rules Explained: नोकरदारांनो लक्ष द्या! पीएफच्या पैशातून घर खरेदी, होम लोन फेडण्यापूर्वी 4 रिस्क लक्षात घ्या, अन्यथा नुकसान होणारच

  • घरमालकाच्या पॅन कार्डचा अचूक तपशील

तुम्ही एका वर्षात 100,000 रुपये प्रत्येक महिन्याला 8,333 रुपयांपेक्षा जास्त घरभाडे भरत असाल तर फॉर्ममध्ये घरमालकाचा पॅन क्रमांक नक्की नमूद करा. वैध पॅनशिवाय तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त रकमेसाठी घरभाडे भत्त्यातील सवलतीचा दावा करू शकणार नाही. त्याचवेळी, चुकीचे किंवा बनावट पॅन क्रमांक सादर करून कर सवलतीचा दावा केल्यास आयकर विभाग नोटीस बजावू शकतो.

लक्षात घ्या की गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आयकर विभागाची AIS-आधारित प्रणाली घरमालकाच्या टॅक्स रिटर्न आणि तुमच्या पॅन क्रमांकाची अधिक वेगाने पडताळणी करते, ज्यामुळे बनावट दावे त्वरित ओळखले जातात.

प्रत्यक्षात भाड्याच्या घरात राहतात पण योग्य कागदपत्रे नाहीत, अशा करदात्यांवर पगारदार व्यक्तींवर सर्वाधिक परिणाम होईल. HRA दावा करताना तुमच्याकडे सर्व 4 वैध पुरावे असल्यास विभागाकडून नोटीस मिळाल्यानंतरही तुमची कर सवलत रद्द होणार नाही.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला. पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव 2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या. 2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले. शैक्षणिक पात्रता​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा

Leave a Reply