दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ संस्थेचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांनी अवयवदान जनजागृतीसाठी २००७ पासून म्हणजे तब्बल १९ वर्षे स्वत: आणि काही उपक्रम फेडरेशनच्या माध्यमातून राबविले. येत्या रविवारी (२ ऑगस्ट) संध्याकाळी साडेचार वाजता डाॅ. नितू मांडके आयएमए हाउस, टिळक रस्ता येथे होणाऱ्या देहांगदान प्रबोधन महाचर्चेचेही ते समन्वयक आहेत. ‘राष्ट्रीय अवयवदान दिना’च्या (३ ऑगस्ट) निमित्ताने त्यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद…

https://www.loksatta.com/pune/organ-body-donation-awareness-sunil-deshpande-interview-amy-95-6048390

अवयवदानासंबंधी जनजागृतीचे कार्य कसे सुरू झाले?

– मला या क्षेत्राची ओळख २००७ मध्ये वाचनात आलेल्या एका लेखामुळे झाली. तेव्हा अवयवयदानाबद्दल निश्चित अशी माहिती फारशी कोणाला नव्हती. ती माहिती मिळविण्यासाठी काही अभ्यास करून त्यावर स्थानिक पातळीवरील व्याख्यानांनी या कार्याला प्रारंभ केला. मी रोटरी क्लबचा अध्यक्ष झाल्यानंतर थोड्या जास्त प्रमाणात याबाबत समाजजागृतीचे प्रयत्न करण्यास सुरुवात केली. यासाठी संपूर्ण राज्यभर पदयात्रेचे आयोजन केले आणि अनेक तज्ज्ञ मंडळींना या पदयात्रेत सहभागी करून घेतले. माझ्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि मी शब्दांकन केलेली अवयवदान प्रतिज्ञा अधिकृत प्रतिज्ञा म्हणून जाहीरही केली. फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही राज्यभर प्रत्यक्ष, तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यशाळांचे आयोजन करतो. मी काही पुस्तकेही लिहिली असून, या विषयावर जनजागृती करणारा एक कार्यक्रमही तयार केला आहे.

अवयवदान आणि देहदान यात फरक काय आहे?

– अवयवदान आणि देहदान या दोन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये करण्याच्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण अवयवदान करतो, तेव्हा देहदान होऊ शकत नाही आणि जेव्हा देहदान करतो, तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांचे दान होऊ शकत नाही. अवयवदान हे एखादी व्यक्ती जिवंतपणी काही मर्यादित स्वरूपात व मेंदूमृत झाल्यानंतर विस्तृत स्वरूपात करू शकते. देहदान हे नैसर्गिक मृत्यूनंतर म्हणजेच हृदयक्रिया बंद पडून झालेल्या मृत्यूनंतर करता येते. जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाइकांना दोनपैकी एक मूत्रपिंड, यकृताचा, फुफ्फुसाचा, स्वादुपिंडाचा अथवा आतड्याचा काही भाग, गर्भाशय अशा अवयवांचे दान करू शकते. ज्या अवयवांचे काही भाग दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित केले जातात, ते अवयव दोन्ही शरीरांत काही कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्णपणे कार्यरत होतात. प्रत्यारोपणाची शक्यता असेल, तरच तज्ज्ञ डॉक्टर यास मान्यता देतात. एखाद्याच्या शरीरातून असे काही भाग काढून घेतल्यास त्याला पुढील आयुष्यात कोणताही शारीरिक धोका संभवत नाही. ब्रेनडेड किंवा मेंदू मृत्यूनंतर रुग्णाच्या शरीरातील आठ ते नऊ अवयव एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात. अवयवदानाचा अर्ज ‘नोटो’ या केंद्र सरकारच्या संस्थेच्या http://www.notto.gov.in या वेबसाइटवर जाऊन भरता येतो.

STORIES YOU MAY LIKE

हेही वाचा

देहदान कसे करता येते?

– ज्या व्यक्तीची देहदानाची इच्छा आहे, त्यांनी देहदानाचे संकल्पपत्र आपल्या जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागात जवळच्या दोन नातेवाइकांचे नाव, पत्ते, दूरध्वनी क्रमांक वगैरे तपशील आणि त्यांच्या सह्यांसह द्यायचे असते. त्या संकल्पपत्राबरोबर दोन छायाचित्रे आणि आधार कार्डची छायाप्रत जोडणेही आवश्यक असते. संकल्पपत्र भरून दिल्यानंतर ‘डोनर कार्ड’ किंवा पोहोच उपलब्ध होऊ शकते. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच महाविद्यालयात अथवा मृत्यूच्या ठिकाणापासून जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मृतदेह सहा तासांच्या आत नेऊन देणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, नेत्रपेढीच्या मदतीने नेत्रदान आणि त्वचादान स्वीकारणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून त्वचादान होऊ शकते. मृतदेहाबरोबर सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, ज्यात मृत्यूच्या कारणाचा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे असते. अनैसर्गिक म्हणजेच पाण्यात बुडून, अपघात, खून तसेच संशयित मृत्यू असणारा मृतदेह स्वीकारला जात नाही.

shriram.oak@expressindia.com

Leave a Reply