Digital Fraud Safety Tips: ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या खरेदीची, खर्च करण्याची आणि पेमेंट करण्याची पद्धत यात झपाट्याने बदल होत आहे. आज डिजिटल व्यवहार हे केवळ एका माध्यमापुरते किंवा एका विशिष्ट प्रसंगापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. किरकोळ दुकाने आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करणे, प्रवासाचे बुकिंग करणे, बिलांचे पेमेंट करणे किंवा दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन करणे अशा विविध कारणांसाठी ग्राहक सातत्याने डिजिटल व्यवहार करत आहेत. त्याचवेळी, डिजिटल व्यवहारांचे वाढते प्रमाण पाहता फसवणूक करणाऱ्यांनाही अधिकाधिक प्रगत पद्धतींच्या माध्यमातून निष्पाप ग्राहकांना लक्ष्य करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या २०२५-२६ वार्षिक अहवालानुसार, फसवणुकीच्या नोंदविण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी जवळपास ७४ टक्के प्रकरणे कार्ड आणि इंटरनेट फसवणुकीशी संबंधित होती. त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या सर्वाधिक नोंद होणाऱ्या प्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. अशा घटनांमुळे आर्थिक नुकसान, गैरसोय आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
अशा घटनांमध्ये सातत्याने वाढत असल्याने डिजिटल आर्थिक व्यवहारांबाबत जागरूकता आणि सुरक्षित आर्थिक सवयी अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित करते. ग्राहककेंद्रित वित्तीय संस्था म्हणून एसबीआय कार्डतर्फे ग्राहकांचे संरक्षण आणि अनुभव अधिक सक्षम करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, अधिक मजबूत सुरक्षा व्यवस्था, 24×7 लाइव्ह चॅट सपोर्ट तसेच संपूर्ण इकोसिस्टिममध्ये ग्राहकांची जनजागृती यामध्ये सातत्याने गुंतवणूक करण्यात येत आहे. त्याचबरोबर, फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी आणि त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्राहकांनीही सतर्क राहणे, काळजीपूर्वक वागणे आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांच्या सवयी अंगीकारणे तितकेच आवश्यक आहे.
हेही वाचा
“डिजिटल पेमेंट्स आणि क्रेडिट कार्ड उद्योगाचे भवितव्य अखेरीस विश्वासावरच अवलंबून असेल. यासाठी प्रगत सुरक्षा पायाभूत सुविधा, डेटा संरक्षण उपक्रम आणि अशा विविध उपाययोजनांमध्ये उद्योगक्षेत्रातर्फे सातत्याने गुंतवणूक करण्यात येत आहे. त्याच वेळी, फसवणुकीच्या पद्धती अधिकाधिक विकसित होत असताना अशा फसवणुका कशा केल्या जातात, याची माहिती असलेले ग्राहक हेच त्याविरुद्धचे सर्वात प्रभावी संरक्षण ठरतात. आलेल्या संदेशांची खातरजमा करणे, संवेदनशील माहिती कोणाशीही शेअर न करणे आणि अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या विनंत्यांबाबत सतर्क राहणे अशा साध्या सवयी अंगीकारल्यास ग्राहकांची फसवणुकीची जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे एसबीआय कार्डच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलिला पांडे म्हणाल्या.
प्रत्येक ग्राहकाने खालील काही महत्त्वाच्या बाबींचे पालन करावे
केवळ विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करा : नेहमी अधिकृत ब्रँडच्या वेबसाइटवरून किंवा विश्वासार्ह मार्केटप्लेसवरूनच खरेदी करा. सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲप्सद्वारे शेअर करण्यात आलेल्या बनावट वेबसाइट्सवरील अनोळखी लिंक्स किंवा अटॅचमेंट्सवर क्लिक करणे टाळा, कारण डिजिटल फसवणुकीचे ते एक प्रमुख माध्यम असते.
केवळ विश्वासार्ह स्रोतांवरूनच ॲप्लिकेशन्स डाउनलोड करा
केवळ अधिकृत ॲप स्टोअरवरूनच मोबाईल ॲप्स डाउनलोड करा. अज्ञात वेबसाइट्स किंवा अविश्वसनीय स्रोतांवरून APK फाइल्स अथवा ॲप्सडाउनलोड करणे टाळा. तसेच व्हॉट्सॲप, एसएमएस, ई-मेल, सोशल मीडिया किंवा क्यूआर कोडद्वारे मिळालेल्या अप्रमाणित लिंक्सवरूनही ॲप्स डाउनलोड करू नका. अशा फाइल्समध्ये मालवेअर असू शकते, ज्यामुळे तुमचे डिव्हाइस आणि वैयक्तिक माहितीला धोका निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा
वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका
कार्डची माहिती, पिन, OTP किंवा CVV कोणासोबतही शेअर करू नका. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी फोन कॉल, ई-मेल किंवा संदेशाची सत्यतापडताळून पाहा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रार किंवा चौकशी नोंदवताना तुमच्या कार्डची माहिती किंवा मोबाइल क्रमांक शेअर करू नका. विश्वासार्ह संस्था कधीही गोपनीय माहितीची मागणी करत नाहीत.
स्क्रीन शेअरिंगद्वारे होणारी फसवणूक टाळा
लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईल फोन यांसारख्या तुमच्या कोणत्याही डिव्हाइसची स्क्रीन अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.फिशिंगच्या प्रयत्नांबाबत सतर्क राहा : तुमचे खाते बंद करण्यात आले आहे, रिवॉर्ड पॉइंट्स किंवा ऑफर्सची मुदत संपत आली आहे, डिलिव्हरी अपडेट, ई-चलान, कराची नोटीस किंवा दंड यांसारख्या कारणांवर आधारित बनावट ई-मेल, संदेश किंवा फोन कॉल्सबाबत सावध राहा. कोणतीही माहिती किंवा खात्याशी संबंधित बदल अधिकृत कस्टमर केअर प्रतिनिधीकडून पडताळून घ्या. विश्वासार्ह संस्था आणि क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या कधीही OTP, CVV, पिन, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती किंवा कार्डधारकाला प्राप्त झालेले संदेश मागत नाहीत.
वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या फोन कॉलची खातरजमा करा
भामटे अनेकदा बँक अधिकारी, क्रेडिट कार्ड प्रतिनिधी, कस्टमर केअर अधिकारी किंवा वित्तीय सल्लागार असल्याचे भासवून फोन करतात. कार्डअपग्रेड, क्रेडिट लिमिट वाढवून देणे, रिवॉर्ड रिडेम्प्शन, सेटलमेंट ऑफर किंवा खाते पुन्हा सुरू करून देण्यासारख्या सेवा देण्याचे आमिष दाखवत ते तातडीची किंवा भीतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असा फोन आल्यास त्वरित कॉल बंद करा आणि संबंधित संस्थेच्या अधिकृत कस्टमर सर्व्हिस माध्यमांद्वारे थेट संपर्क साधा.
हेही वाचा
पेमेंटशी संबंधित फसवणुकीबाबत सतर्क राहा आणि संशयास्पद व्यवहाराची त्वरित तक्रार करा
तुमच्या खात्यात कोणतेही अप्रमाणित पेमेंट किंवा रिफंड जमा झाल्याचे दिसल्यास, कोणतीही कृती करण्यापूर्वी ती रक्कम प्रत्यक्षात खात्यात जमा झालीआहे का, याची खातरजमा करा. चुकून तुम्ही संवेदनशील माहिती शेअर केली असेल, संशयास्पद लिंकवर क्लिक केले असेल, अप्रमाणित ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले असेल किंवा खात्यात अनधिकृत व्यवहार आढळल्यास तात्काळ तुमच्या बँकेशी किंवा कार्ड जारीकर्त्याशी संपर्क साधा, संबंधित कार्ड किंवा खाते ब्लॉक करा आणि कोणताही विलंब न करता सायबर गुन्हे प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवा.
ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉइंट्सची खातरजमा करा
विशेषतः महागड्या वस्तूंवरील अवास्तव सवलती, रिफंडविषयीच्या सूचना किंवा फसव्या ऑफर्सबाबत सावध राहा. कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी संबंधित ब्रँडकडून ऑफरची खातरजमा करा. त्याचप्रमाणे, रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास किंवा वैयक्तिक अथवा क्रेडिट कार्डची माहिती शेअर करण्यास सांगणारे एसएमएस, ई-मेल किंवा फोन कॉल यांची सत्यता पडताळून पाहा. खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कृती करू नका.
व्यवहारांचे अलर्ट सुरू ठेवा आणि खात्यांवर नियमित लक्ष ठेवा
कार्डद्वारे होणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी एसएमएस, ई-मेल आणि मोबाइल ॲप्लिकेशनवरील सूचना सुरू ठेवा. खात्यातील व्यवहारांची नियमितपडताळणी करा आणि कोणताही अनधिकृत किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्याची त्वरित माहिती तुमच्या कार्ड जारीकर्त्याला द्या.
नेहमी मजबूत पासवर्ड निवडा
खात्याचा पासवर्ड नियमितपणे बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ई-मेल किंवा सोशल मीडिया खात्यांच्या पासवर्डपेक्षा वेगळा, मजबूत आणि वैशिष्ट्यपूर्णपासवर्ड वापरा. तुमचा पासवर्ड कधीही कोणासोबतही शेअर करू नका.
डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे एखादे एकमेव साधन किंवा तंत्रज्ञान नव्हे, तर जागरूकता, सतर्कता आणि जबाबदारीने आर्थिक व्यवहार करण्याच्या सवयी यांचा समन्वय होय. फसवणूक करणारे भामटे सतत नवनवीन पद्धती अवलंबत असताना ग्राहकांनीही आपल्या वैयक्तिक आणि आर्थिक माहितीच्या सुरक्षेबाबत तितकेच सक्रिय राहणे आवश्यक आहे. योग्य माहिती, जागरूकता आणि सतर्कता यांच्या बळावर ग्राहक डिजिटल पेमेंट सोल्यूशन्सचा अधिक आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे वापर करू शकतात.