*महत्वाचे वाटले म्हणून ह्या ग्रुप वर टाकते आहे*
आपल्या पुण्यातील ओळखीच्या सदस्यांसाठी
काल दिनांक 25 रोजी “धन्वंतरी हॉल मध्ये एक प्रदर्शनी भरलेली होती . ही प्रदर्शनी जेष्ठ नागरिकांसाठी ज्या संस्था काम करतात त्या संस्थांची माहिती सर्वाना व्हावी यासाठी होती , ह्या संस्था जेष्ठ नागरिकांसाठी काय काय काम करतात, त्यांच्या कामाची पद्धत काय आहे त्याची माहिती —- . एकंदर १० स्टॉल ना भेट दिली . सर्वच संस्था या आपल्या सेवेसाठी पैसे आकारतात . त्या संस्थांची थोडक्यात माहिती खलिलप्रमाणे
१) मोरया दातांचा दवाखाना : तुमच्या घरी पॉटेबल डेंटल चेअर घेऊन येतात व संपूर्ण दंतउपचार करतात त्यांचा फोन नंबर आहे ८६२३८२९९६२
२)रेनबो डे केअर सेंटर : सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत जेष्ठ नागरिक या सेंटर मध्ये येतात त्यांना ब्रेक फास्ट , जेवण व चहा मिळतो घरातून सेंटरपर्यंत आणण्याची व परत पोचविण्याची सोय आहे . ते सेंटर डाव्या भुसारी कॉलनीत आहे त्यांचा फोन नंबर आहे ९८५०८८६५७५
३)वृद्ध मित्र : जेष्ठ नागरिकांना सकस अन्न , औषधे , व्हिटॅमिन्स , सप्लिमेंट्स , अडल्ट डायपर्स , चालण्याच्या काठ्या (Walking Sticks ), व्हील चेयर्स पुरविणे , डॉक्टरचा सल्ला , विविध तपासण्या , फिझिओथेरपी ,घरात रुग्ण असतील तर रुग्ण स्वच्छता , बेडरिडन रुग्णांना फीडिंग , बेड सौर्स ,कॅथेटर , डायपर पुरवणे , बदलणे , या व्यतिरिक्त आपण ज्या सेवा देतो त्या सर्व सर्व सेवा देतात . त्यांच्या माहितीपत्रकानुसार या सर्व सेवा बाजारभावाच्या तुलनेत ५०ते ७५% सवलतीच्या भावाने पुरविल्या जातात . त्यांचा फोन नंबर आहे ७७५७९८८६४४, ९५७९९८५८४४
४) अन्वय किन केअर : हि संस्था हेल्थकेअर , इमर्जन्सी केअर , सोशल केअर , डिमेन्शिया केअर इत्यादी सेवा देते त्यांचे फोन नंबर ७२८८८१८१८१ व ९३९२६८२९२२
५) Being With You : हि संस्था रुग्णलयात दाखल झालेल्या रुग्नांना केअरटेकर म्हणून काम करते स्वयंसेवकांची सेवा Time Bank मध्ये जमा होते आणि रुग्णाकडून परस्पर स्वयंसेवकांना २०० रुपये मिळतात फोन नंबर ७२७६७९७१२४ (पुणे )
या व्यतिरिक्त अजून काही संस्था
१) दिवेकर केअर सर्विसेस फोन नंबर ८७००६९०१८६
२) समर्थ : ८७००६९०१८६
३) मदतनीस : ८०१०५४००७०
४) असिस्ट फॉर पेरेंट्स : WWW . assist ४ parents .com
नेहमी विविध सेवांसाठी विचारणा होते . त्या संस्थांची माहिती इतरांना देणेसाठी ही पोस्ट आहे , व्हाॅट्सॅप वर स्टार करून हि माहिती जपून ठेवावी व इतरांना द्यावी