मालमत्तेची कागदपत्रं हरवली? डुप्लिकेट कॉपी कशी मिळायची, अर्ज कुठं करायचा? जाणून घ्या(फोटो- TIL Creatives)Property Rights: घर, फ्लॅट किंवा जमिनीची नोंदणी केवळ कागदाची प्रत नसून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी मालमत्ता आणि मालकीचा कायदेशीर पुरावा आहे. ही कागदपत्रे अचानक हरवली किंवा चोरीला गेल्यास बहुतेक लोक घाबरतात आणि मालमत्ता धोक्यात येऊ शकते किंवा भविष्यातील विक्री आणि कायदेशीर कार्यवाहीमध्ये त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशी अनेकांना भीती वाटते. पण कायदे तज्ज्ञ म्हणतात की अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही.

मालमत्तेची कागदपत्रे हिरवी तर…

सर्वप्रथम तुमच्या जुन्या मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर त्यासाठी एक संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे.वेळेवर योग्य पावले उचलल्यास तुमच्या नोंदणीची दुसरी प्रत सहज मिळवू शकता आणि तुमच्या मालमत्तेचे संरक्षण करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निष्काळजीपणा करण्याऐवजी तात्काळ कारवाई करा.
Maharashtra TimesDelhi Gymkhana: 20 लाखांची मेंबरशिप, 129 कोटी Net Worth; जिमखान्याच्या जमिनीवरून दंगल… 27 एकर जमिनीवर सरकारचा डोळा
सर्वप्रथम एफआयआर दाखल करा
मालमत्तेची कागदपत्रे गहाळ झाल्याचं झाल्याचं लक्षात येताच सर्वप्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. कागदपत्रे खरोखरच गहाळ झाल्याची FIR हा सर्वात महत्त्वाचा कायदेशीर पुरावा असतो. पुढील संपूर्ण प्रक्रियेत त्याची आवश्यकता भासेल त्यामुळे, एफआयआरची एक प्रत नेहमी सुरक्षित ठेवा. त्यानंतर स्थानिक आणि प्रमुख वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करणेही महत्त्वाचे आहे. या सूचनेत मालमत्तेचा तपशील, मालकाचे नाव आणि गहाळ झालेल्या कागदपत्रांचा समावेश असेल ज्याचा उद्देश जनतेला माहिती देण्याचा असेल जेणेकरून कोणीही कागदपत्रांचा गैरवापर किंवा बनावटगिरी करू शकणार नाही.

उप-नोंदणी कार्यालयात अर्ज करा
त्यानंतर, मालमत्तेची मूळ नोंदणी झालेल्या उप-नोंदणी कार्यालयात दुय्यम प्रतीसाठी लेखी अर्ज सादर करा. स्टॅम्प पेपरवर नोटरीकृत हमी किंवा प्रतिज्ञापत्र देखील सादर करा ज्यामध्ये मालमत्तेचा पत्ता, मालकाचे नाव, एफआयआरची प्रत आणि सार्वजनिक सूचनेची वृत्तपत्रातील कात्रण यांचा जोडा.
Maharashtra Timesमायक्रोसॉफ्ट कंपनीला AI चा फटका! इंजिनिअर्सना क्लाउड कोड वापरण्यास सक्त मनाई, वाढत्या खर्चामुळे वर्षाचं बजेट महिन्यातच कोलमडलं
मालमत्तेची दुय्यम नोंदणी पत्र कशी मिळवायची?
नोंदणी कार्यालय तुमच्या सर्व कागदपत्रांची आणि दाव्यांची तपासणी करा. विभाग आपल्या नोंदींशी तुलना करून माहितीची पडताळणी करेल आणि सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे आढळल्यास तुमच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजाची दुय्यम प्रत, किंवा प्रमाणित प्रत, जारी केली जाईल. ही प्रत कायदेशीररित्या वैध असून भविष्यातील मालमत्तेसंबंधी सर्व कामांसाठी वापरली जाऊ शकते.

मालमत्तेची मूळ कागदपत्रे हरवल्यास बहुतेक लोक घाबरतात. पण अशा परिस्थितीत, वेळेवर तक्रार दाखल केली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास तुमचे मालकी हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि त्यामुळे, तुमची नोंदणी किंवा जमिनीची कागदपत्रे कळत-नकळत हरवली तर तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू करा आणि सर्व आवश्यक नोंदी जपून ठेवा.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे. मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला. पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव 2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या. 2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले. शैक्षणिक पात्रता​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा

Leave a Reply