
Oil cap –Russia–all we wanted to know –Courtesy BusinessLine

आपण आतापर्यंत लघु उद्योजकांना येणाऱ्या अडचणी कोणत्या ––त्यावर कशी मात करायची वगैरे बाबत विचार करत होतो. परंतु करोना मुळे आपण सर्वच जण केवळ अडचणीत आलो आहोत असे नाही तर पुढे काय करायचे हे देखील आपणाला कळेनासे झाले आहे. पण सर्वात महत्वाचे – माझ्या दृष्टीने – आता पुढे व्यवसाय कसा करायचा / व्यवसाय करायच्या पध्दतीत काही बदल करायचा का याचा विचार देखील आपण करणे गरजेचे ठरणार आहे. नवीन काही शिकायचे असेल तर जुने विसरावे लागते –-सर्वच जुने वाईट आहे असे नाही तर जे आता कालबाह्य झाले आहे ते तरी विसरण्याची आपली तयारी आहे का ? की वर्षानुवर्षे जसा व्यवसाय करत आलो तसाच करायचा याचा देखील वेळीच विचार वेळीच करावा लागणार आहे. मला जे उपयुक्त वाटते ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही विचार करा , तुमचे मंत कळवा. पण एक गोष्ट नक्की करा, विचार न करता घाईघाईत व्यवसाय सुरु करू नका—जोपर्यंत तुम्ही समग्र विचार करत नाही तोपर्यंत–