आपण व्यवसाय करताना अनंत अडचणींना तोंड देत असतो. आयकर — जीएसटी –बँक पतपुरवठा — नवीन कामगारविषयक कायदे — नवीन येऊ घातलेला DPDP ACT –असे सर्वच विषय आपल्याला नवीनच आहेत. त्याबाबत आपण तोंडओळख करून घेणे आवश्यकच आहे. त्या दृष्टीने हा एक छोटासा प्रयत्न आहे. तसेच अर्थविषयक बातम्या — आणि रिजर्व्ह बँक — आयकर आणि जीएसटी वगैरे विषयाबाबतील त्या त्या दिवशी आलेल्या बातम्या बाबत माहिती देण्याचा इरादा आहे. हेतू हा की आपण सक्षम होत जावे. पुढील मार्गक्रमणा सुकर व्हावी या मर्यादित हेतूने हे संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळा मध्ये उद्घृत केल्या जाणाऱ्या माहिती बाबत काही खुलासा किंवा जास्ती माहिती पाहिजे असेल तर मला tikotekar@outlook.com या इमेल वर अवश्य विचारावे. पण आपणास कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आपण आपले सल्लागार [ चार्टर्ड अकाउंटंट — वकील –वगैरे ] याच्याशी चर्चा करावी आणि मगच निर्णय घ्यावा. [२] आपल्या काही सूचना असतील तर त्या अवश्य कराव्यात मला आणि इतर वाचकांना त्याचा उपयोग होईल–[३] महत्वाचे — हे संकेतस्थळ वापरण्यासाठी कोणतीही फी नाही — थोडक्यात कोणत्याही तऱ्हेने वा कोणत्याही पद्धतीने अर्थार्जन हा विषयच नाही हे समजून घ्यावे अशी विनंती आहे.