गरीब व श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये उत्पन्नाच्या दृष्टीने फरक आहे –त्यामुळे श्रीमंत शेतकऱ्यावर कर लावणे अयोग्य नाही पण याबाबतीत राज्य सरकारला अधिकार आहेत ते योग्य तो पुढाकार घेऊ शकतात

सविस्तर माहितीसाठी   The Economic Times   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

बिल्डर्स आता एक मे २०१७ पासून त्यांचा प्रोजेक्ट Real Estate Regulatory Authority यांच्याकडे नोंदणी केल्याशिवाय त्याची जाहिरात करू शकणार नाहीत. या बाबतचा कायदा अमलात आला आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण कमी होईल.

सविस्तर माहितीसाठी The Economic Times   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे    

भारतातील औद्योगिक क्षेत्राने —त्यांच्या परतफेडीच्या क्षमतेच्या तुलनेत —आणि जगातील इतर देशाच्या तुलनेत — फार मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलेले आहे —-तसेच भारतीय बँकाना बुडीत कर्ज खात्याचा धोका मोठा आहे व त्यासाठी पर्याप्त भांडवल लागेल व बुडीत कर्जे ज्या प्रमाणात वाढत आहे त्याप्रमाणात भारतीय बँकांनी आपले भांडवल फारसे वाढवले नाही असे मत आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशने व्यक्त केले आहे

सविस्तर माहितीसाठी  Business Standard   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

रिझर्व बँकेचे महागाई दराबाबतचे अंदाज चुकले आहेत का ? ६ जणांची कमिटी [ MPC ] नेमली आहे त्यांनी व्यक्त केलेला अंदाज प्रत्यक्षात बऱ्यांच मोठा फरकाने चुकला आहे त्यामुळे व्याज दराबाबतचा निर्णय घेताना चूक झाली असण्याची शक्य आहे —प्रसिद्ध स्तंभ लेखक श्री सुरजित भल्ला

सविस्तर माहितीसाठी    The Financial Express       मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

घर व ऑफिसेस साठी कर ३ ते ३.५% ठेवण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव आहे त्यामुळे मागणीत वाढ होईल असा अंदाज आहे . तसेच हा कर दर सगळीकडे सारखा ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच आयात कर ७% इतकाच ठेवण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे इतर देशात भारताबद्दल चांगला संदेश जाण्याची शक्य आहे

सविस्तर माहितीसाठी  Financial Express   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

आर्थिक वर्ष २०१६-२०१७ साठी एकूण कर संकलन १७.१० लाख कोटी इतके झाले आहे, जे गेल्या ६ वर्षातील जास्तीत जास्त आहे. अर्थ मंत्र श्री जेटली यांचा अंदाज आहे की २०१७-२०१८ मध्ये १९-२० लाख कोटी इतका कर जमा होईल.

सविस्तर माहितीसाठी Financial Express     मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

रुपया डालर च्या तुलनेत वधारत आहे यात काळजी करण्यासारखे काही नाही असे The Economic टाइम्स ने त्यांच्या अग्रलेखात म्हटले आहे. आयात स्वस्त होईल व त्यामुळे महागाई दरवाढ कमी होईल व नवीन प्रोजेक्टची अंमलबजावणी होईल जी भराच्या अर्थव्यवस्थेची गरज आहे

सविस्तर माहितीसाठी The Economic Times            मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे   via Don’t fret too much over a strong rupee:

अमेरिकाचा ग्रॉस डोमेस्टिक product १.८% इतक्या कमी दराने गेल्या वर्षी वाढला. ही वाढ २०११ पासूनची सर्वात कमी वाढ आहे. प्रेसिडेंट श्री ट्रम्प यांना खात्री आहे की पुढील काही वर्ष GDP ५% पर्यंत देखील जाईल.

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

लघु उद्योग भारती यांनी काही GST बाबत सूचना केल्या आहेत त्यातील काही सूचना [अ] ज्यांची विक्री २ कोटी पेक्षा कमी आहे त्यांना शून्य दराने कर आकारणी व्हावी–कमीत कमी पुढील ३ वर्षे तरी . [ब] माहिती देण्याची क्लिष्ट पद्धत सोपी करावी [क] E-Way बिल , हिशोब व रेकॉर्ड ठेवणे यात सुलभपणा आणावा वगैरे

सविस्तर माहितीसाठी   The Economic Times   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

उत्पादन क्षेत्राचे योगदान — GDP च्या तुलनेत —-घसरून १५-१६% इतके खाली आहे. अर्थमंत्री श्री जेटली चे म्हणणे आहे की सरकार हे योगदान २५% पर्यंत आणण्याचा विचार करत आहे. असे होऊ शकले तर भारताची आर्थिक प्रगती लवकर होईल

सविस्तर माहितीसाठी   The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

भारताची निर्यात $ ३२५ अब्ज एवढी २०१७-२०१८ मध्ये होण्याची शक्यता आहे . याचे मुख्य कारण भारतीय उत्पादने स्पर्धात्मकता दृष्ट्या सक्षम होत आहेत तसेच जगातील मागणी देखील वाढली आहे . तसेच मजबूत रुपया निर्यातीस पोषक ठरतो आहे उदाहरणार्थ मार्च १७ मध्ये रुपयाचा दर सुधारून 64.86/$ इतका झाला होता तरी निर्यातीत वाढ २.२९% वरून २७.५९% इतकी झाली

सविस्तर माहितीसाठी The Economic Times    मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे     via Exports may touch $325 billion in 2017-18: PHD Chamber –

रुपयाचे मूल्य परकी चलनाच्या तुलनेत फार वाढू नये असे अर्थ सल्लागार श्री अरविंद सुब्रम्हण्यम यांचे मत आहे . याचे मुख्य कारण आपल्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो तसेच अर्थव्यवस्था देखील अडचणीत येऊ शकते . तसेच रुपया फार ताकदवान झाला तर आयात वाढू शकते व त्याचा विपरीत परिणाम देशातील उद्योगावर होऊ शकतो

सविस्तर माहितीसाठी   The Economic Times  मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

व्याज न मिळणाऱ्या कर्जात—सर्व बँकाचे मिळून — जून २०१६ मध्ये ६ लाख कोटी इतकी वाढ झाली होती याला जबाबदार कोण आहे व आता यात सुधारणा होण्यासाठी काय तातडीचे उपाय योजता येतील ?

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times     मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे via Swindling of the exchequer through bad loans from public sector banks, and

भारतीयांनी विसा बद्दल आलेल्या बातम्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही कारण भारतीयांना भारतातचा पुष्कळ संधी आहे. –कॅबिनेट सेक्रेटरी श्री सिंह यांचे मत

सविस्तर माहितीसाठी    The Economic Times    मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

1 1,021 1,022 1,023 1,024 1,025 1,031