Chq Dishonoured ?

आपण व्यवसाय करत असताना आपल्याला वेगवेगळ्या अडचणी येत असतात.

काही वेळेस आपल्याला मिळालेला चेक वठत नाही व त्यामुळे आपल्याला पैश्याची अडचण तर निर्माण होतेच पण  मनःस्ताप देखील होतो. काय करावे ते समजत नाही कारण आपल्याला  –तोपर्यंत असा कोणताही –अनुभव आलेला नसल्यामुळे भांबावून  जातो. कोर्ट व कोर्टाची पायरी चढणे नको वाटते.

वकिलांचा खर्च किती येऊ शकतो याची कल्पना नसते. चांगला वकील मिळेल याची खात्री वाटावी अशी आपली परिस्थिती नसते.

अशा वेळेस  आपणास थोडेसे तरी कायदेशीर बाबींचे ज्ञान असेल तर आपण भांबावून जात नाही व पुढील उपायांची चाचपणी करू लागतो व त्यामुळे थोडेसे तरी  टेन्शन कमी होते.