23.02.2019–IBC reigns supreme over other civil laws, says Delhi High Court | Business Standard News
अतिलहान, लघु व मध्यम उद्योजक [ एमएसएमई ] देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांना अजून सक्षम करण्यासाठी व त्यायोगे देशाच्या अर्थव्यवस्थेस उभारी देण्यासाठी , सरकार कायमच प्रयत्नशील आहे. परंतु हेही नाकारता येत नाही की एमएसएमई — त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत —प्रगती करण्यात कमी पडत आहेत. याची कारणे काय आहेत , त्यांना काय तऱ्हेच्या मदतीची गरज आहे. याचा विचार सातत्याने होण्याची गरज आहे. अनेक उपायांपैकी एक उपाय म्हणजे उद्योजकांना आवश्यक असणारी माहिती पुरवणे व त्यायोगे त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करणे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून असा प्रयत्न करण्याचा मानस आहे. तसेच नवीनच अमलात आलेला दिवाळखोरी कायदा कसा उपयोगी पडू शकतो याचेही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे. वरील सर्व प्रयत्नामध्ये तुम्ही —तुमचे मत कळवून –सहभागी होऊ शकता.