👍👍👍👍👍How Property is Divided Without Bequest; मृत्युपत्राविना निधन झाल्यास कसं होतं संपत्तीचं वाटप होते? मुलांशिवाय यांचाही संपत्तीवर अधिकार | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/business/business-news/how-assets-are-divided-among-children-if-person-dies-without-a-will-know-property-legal-rights/articleshow/99728966.cms

Property Division Rule in India : हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ नुसार वडील आणि वडिलोपार्जित मालमत्तेच्या विभाजनासंबंधी महत्त्वाचे नियम आणि कायदे आहेत. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या वादाचे निराकरण करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. वडिलांच्या किंवा घराच्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर भाऊ आणि बहिणीमध्ये मालमत्ता वाटपाचे काय नियम आहेत? जाणून घेणे आवश्यक आहे.

How is property divided without a will_

नवी दिल्ली : प्रत्येक कुटुंबात अनेकदा मालमत्तेबाबत वाद होत असल्याचे पाहायला मिळतात. कधी भाऊ-बहिणीमध्ये तर कधी भावांमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेबाबत भांडण होते. कुटुंबप्रमुख म्हणजेच आई-वडील जिवंत असेपर्यंत मालमत्तेबाबत कोणताही वाद होत नाही, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील मालमत्तेबाबत भावंड किंवा भावांमध्ये वाद झाल्याचे आपल्यासमोर अनेक प्रकरणे आहेत. मात्र, अशी स्थिती टाळण्यासाठी पालक जिवंत असताना मुलांमध्ये मालमत्ता वाटून घेणे सर्वोत्तम पर्याय आहे.

कुटुंबप्रमुख जिवंत असताना जर मालमत्तेची विभागणी करू शकत नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर मालमत्तेची विभागणी कशी करावी आणि त्याबाबत काय नियम आहेत, याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.

हिंदू-मुस्लिममधील मालमत्ता विभागणीचे वेगवेगळे नियम
देशातील मालमत्तेच्या अधिकाराबाबत हिंदू आणि मुस्लिम धर्मांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ मध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनाही वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मानले आहेत. या कायद्यानुसार जेव्हा हिंदू व्यक्ती मृत्यूपत्र न बनवता मरण पावते, तेव्हा त्या व्यक्तीची संपत्ती त्याचे वारस, नातेवाईकांमध्ये कायदेशीररित्या वाटली जाते.

हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ काय आहे?
हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ अन्वये जर मालमत्तेचा मालक म्हणजे वडील किंवा कुटुंबप्रमुख मृत्यूपत्र न करता मरण पावला, तर ती मालमत्ता वर्ग-१ वारसांना (मुलगा, मुलगी, विधवा, आई, मुलगा) दिली जाते. क्लास १ मध्ये नमूद केलेल्या वारसांची उपलब्धता न झाल्यास, वर्ग २ च्या वारसांना (मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ, बहीण) मालमत्ता देण्याची तरतूद आहे. तसेच हिंदू उत्तराधिकार कायद्यात बौद्ध, जैन आणि शीख समुदायांचाही समावेश आहे.

याशिवाय वडिलोपार्जित मालमत्तेबाबत निर्णय घेण्याचा वडिलांना अधिकार नाही, त्यामुळे मुलगा आणि मुलगी दोघांनाही संपत्तीवर समान हक्क मिळातो. यापूर्वी मुलीला मालमत्तेत समान अधिकार नव्हते, परंतु २००५ मध्ये उत्तराधिकार कायद्यात महत्त्वपूर्ण दुरुस्ती केल्यानंतर मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत पुत्रांप्रमाणे समान अधिकार देण्यात आले आहेत.

आर्थिक अडचणींमुळे अडलेलं घराचं स्वप्न आता होणार पूर्ण !

दरम्यान, लक्षात घ्या की कोणत्याही मालमत्तेचे विभाजन करण्यापूर्वी दावेदारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की मालमत्तेवर कोणतेही थकित कर्ज किंवा इतर प्रकारच्या व्यवहाराशी संबंधित देय नाहीत. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद किंवा इतर बाबींसाठी कायदेशीर सल्लागारांची मदत घ्यावी, जेणेकरून कौटुंबिक वाद कायद्याच्या कक्षेत राहून शांततापूर्ण मार्गाने सोडवता येतील.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s