👍👍👍👍👍सहकारी संस्थांचा निधी गुंतविताना – सहकारी संस्थांचा निधी गुंतविताना – Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/-/articleshow/6876748.cms

सहकारी संस्थांचा निधी गुंतविताना काय काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन.

निधींचा विनियोग

उपविधी क्रमांक १४- संस्थेस निधीतील रकमांचा विनियोग खाली नमूद केलेल्या पद्धतीने करता येईल.

राखीव निधी- संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्त्या, त्यांची देखभाल आणि नूतनीकरण यावर होणाऱ्या खर्चासाठी संस्थेला निधी उपयोगात आणता येईल.

दुरुस्ती आणि देखभाल निधी- समितीस संस्थेच्या मालमत्तेची दुरूस्ती, देखीभाल आणि नूतनीकरण यांवर खर्चासाठी संस्थेला दुरस्ती आणि देखभाल निधी उपयोगात आणता येईल.

निक्षेप निधी (सिकिंग फंड) इमारत / इमारतींची पुनर्बांधणी करणे. संस्थेच्या स्थापत्यशास्त्रज्ञाच्या मताने इमारत/ इमारतीस बळकटी आणण्यासाठी आवश्यक असलेले जादा बांधकाम किंवा बांधकामातील फेरफार करणे किंवा त्याने दिलेल्या दाखल्यास अनुसरून इमारतीस/ इमारतीत मोठ्या/ असामान्य/ महत्त्वाच्या दुरुस्त्या करणे यासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करून आणि नोंदणी अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने संस्थेला सिंकिंग फंड उपयोगात आणता येईल.

संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंमत्तीने मोठ्या / असामान्य / महत्त्वाच्या दुरुस्त्यांसाठी जमा केलेली रक्कम उपयोगात आणता येईल.

रकमांची गुंतवणूक

उपविधी क्रमांक १५ – संस्थेच्या व्यवहारात वापरला नसेल असा पैसा संस्थेस अधिनियमाच्या कलम ७०प्रमाणे गुंतवावा किंवा ठेवावा लागेल. मात्र सिकिंग फंडासाठी गोळा केलेल्या रकमा कलम ७० अन्वयक मान्यताप्राप्त प्रकारांपैकी एका प्रकारे दीर्घ मुदतीसाठी, गुंतवणुकीवरील मिळालेल्या व्याजासह वरील प्रमाणेच गुंतवण्यात येईल. संस्थेकडील अतिरिक्त निधी गुंतवण्यासाठी आणखीही काही गुंतवणूक निधी आहेत. त्यापैकी एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट फ्लक्चुएशन फंड:

आथिर्क व्यवहार करताना सहकारी संस्थेकडे काही निधी शिल्लक राहतो. तो ताबडतोबीने खर्च करायलाच पाहिजे अशी परिस्थिती नसते. परंतु हा निधी तसाच पडून राहणे योग्य नसते. तो अशा रीतीने गुंतविणे इष्ट असते की, सोसायटीला गरज भासेल त्यावेळी तो सहजरीत्या उपलब्ध होईल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्यावर व्याज मिळू शकेल. १९८२च्या इंडियन ट्रस्ट अॅक्टच्या २० कलमाखाली निदेर्श केलेलया कर्जरोख्यांत सहकारी गृहनिर्माण संस्था आपला निधी गुंतवू शकते याचा उल्लेख यापूवीर् आलाच आहे. तसेच मर्यादित जबाबदारी असलेल्या अन्य कोणत्याही सहकारी संस्थेच्या भाग भांडवलातसुद्धा सोसायटी आपला निधी गुंतवू शकते. शेअर्सच्या किमतीत चढउतार होत असतात. दरात होणाऱ्या वधघटीमुळे संस्थेला, आथिर्क संस्थेला आथिर्क नुकसान सोसावे लागू नये म्हणून १९६१च्या महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांच्या नियम क्रमांक ५५ (३) प्रत्येक सोसायटीने इन्व्हेस्टमंेट फ्लक्च्युएशन फंड स्थानप केला पाहिजे असे बंधन आहे. परंतु असा फंड स्थापण्याची जबाबदारी सहकारी गृहनिर्माण संस्थेवर पडत नाही. कारण सहकारी गृहनिर्माण संस्था ही व्यापारी संस्था नसून सेवा संस्था आहे. त्यामुळे तिच्याकडे अतिरिक्त निधी असण्याची सुतराम शक्यता नाही. आणि सर्वसामान्यपणे या संस्थेच्या ठेवी जिल्हा मध्यवतीर् सहकारी बँक किंवा राज्य सहकारी बँक यांमध्ये ठेवल्या जातात आणि त्यासुद्धा दिर्घ मुदतीने. त्याचप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थांनी अन्य सहकारी संस्थांप्रमाणेच बुडीत कर्जनिधी स्थापन करण्याची गरज नाही.

सिंकिंग फंड

यामधील निधी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी वापरावयाचा असतो. त्याकरीता नोंदणी अधिकाऱ्यांची पनवानगी आवश्यक असते. बहुसंख्य सहकारी गृहनिर्माणसंस्था बुडीत कर्जनिधी स्थापन करीत नसल्या, तरी त्यांच्या काही रकमा बुडीत टाकण्याची पाळी येते. उपविधी क्रमांक १५०- उपविधी क्रमांक १५१ मधील तरतुदींच्या अधिनतेने कर्जाची मुळ रक्कम त्यावरील येणे व्याज आणि सभासदांकडून येणे असलेल्या संस्थेच्या रकमा या रकमांचा वसुलीसाठी खर्च केलेल्या रकमा आणि संचित तोटा याबाबतीत लेखा परिक्षकांनी वसूलीस अपात्र असल्याचे प्रमाणीत केल्यास संस्थेला त्याबुडीत टाकता येतील. उपविधी क्रमांक

१५१-उपविधी क्रमांक १५० मध्ये नमुद

केलेल्या रकमा बुडीत टाकावयाच्या झाल्यास खालील बाबींची पुर्तता झाल्याशिवाय तसे करता येत नाही.

अशा रकमा बुडीत खाती टाकण्यास सर्वसाधारण सभेने परवानगी दिली असली पाहिजे.

सदर संस्था ज्या वित्तपुरवठा संस्थेची ऋणको असेल. ज्या वित्तपुरवठा संस्थेच्या रकमा बुडीत टाकण्यास मान्यता देण्यात आली पाहिजे.

नोंदणी अधिकाऱ्याची मान्यता घेण्यात आली पाहिजे. संस्थेचा पैसा कर्जरोखे डिबेंचर्स, शेअर्स यामध्ये गुंतविताना व्यवस्थापक कमिट्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. आजच्या काळात तर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे.

४४ नंदकुमार रेगे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s